ऐन हिवाळ्यात पाऊस मुंबईच्या वेशीवर! राज्यातील या जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसाचा तडाखा – News18 लोकमत

Written by

55 हजारांच्या जवळपास पोहोचलं सोनं, तुमच्या जिल्ह्यात किती महाग झालं पाहा?
मुंबई : सिद्धिविनायक मंदिर आजपासून पाच दिवस बंद; 'या' कारणामुळे घेतला निर्णय
तब्बल 1,00,000 रुपये पगार आणि पात्रता ग्रॅज्युएशन; उद्याची शेवटची तारीख
अभ्यास केला नाही म्हणून मॅडमांनी दिली भयानक शिक्षा, तुम्हालाही बसेल धक्का
मुंबई, 14 डिसेंबर : राज्यात गेल्या दोनचार दिवसांपासून जे वातावरण आहे. त्यावरुन हिवाळा आहे की पावसाळा असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. कारण, गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू झालाय. तसाच काहीसा पाऊस आज बदलापूर शहरात देखील सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांना भिजत तर काहींना छत्रीचा आधार घेत आपले इच्छित स्थळ गाठावा लागले. दुपारी उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी पडलेला हा पाऊस या वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
बदलापूर शहरात बरसल्या पावसाच्या सरी एन हिवाळ्याच्या मोसमात बदलापूर शहरात पावसाच्या सरी बरसत आहेत.
राज्यात आज हिंगोली, पालघर, बुलढाण्यासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलीय. तर पुढील काही तासात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे मुंबईच्या वेशीवर असलेल्या बदलापूर शहरात पावसाच्या सरी बरसल्या. ऐन हिवाळ्याच्या मोसमात बदलापूर शहरात पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे लवकरच मुंबईकरांनाही पाऊस गाठण्याची शक्यता आहे.
वाचा – 12 महिने लागवड करा आणि 15 लाखांपर्यंत नफा कमवा, कशी करायची पपईची शेती?
पालघर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं शेतकरी धास्तावले असून वीटभट्टी व्यावसायिक देखील चिंतेत आहेत. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे जिल्ह्यातरी अवकाळी पावसाचा धास्ती
पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहर आणि तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण तर रात्रीच्या दरम्यान काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने रब्बी हंगाम धोक्यात आलाय. तरकारी, पिके, फळे आणि फुले यावर वातावरण बदलाचा परिणाम झाला असून पिकांवर रोगराई वाढल्याने शेतकरी अडचणीत आलाय. अचानक वातावरणातील बदल आणि पावसामुळे द्राक्षे, पेरु फळबागाधारक शेतकरी धास्तावला आहे. तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यात आज सायंकाळी खामगाव, नांदुरा ,मोताळा तालुक्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. यामुळे खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील नदीला हिवाळ्यात पूर आला आहे. तर अनेक भागात पावसाने कांदा, हरभरा पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Rain

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares