बोलून बातमी शोधा
चाकण, ता. १४ : चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीमुळे परिसरातील रस्त्यावर विशेषत: पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी आदी सर्व त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडी विरोधातील जनआक्रोश केंद्र व राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारला दिलेल्या निवेदनानुसार तातडीने कार्यवाही होण्यासाठी गुरुवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथील आंबेठाण चौकात खेड तालुका वाहतूक कोंडी विरोधी कृती समितीच्या वतीने चक्काजाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती खेड तालुका वाहतूक कोंडी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष कुमार गोरे यांनी दिली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

Article Tags:
news