बोलून बातमी शोधा
पालघर, ता. १३ (बातमीदार) : जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे यांनी कृषी व पशुसंवर्धन अंतर्गत सुरू असणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी साखरे व मान ग्रामपंचायतीला भेट दिली. या वेळी संदीप पावडे यांनी साखरे येथील शेळी लाभार्थी गीता जाधव आणि मोनाली माळी, खांड नालीपाडा येथील म्हैस लाभार्थी विलास माळी, मान दिघेपाडा येथील विहीर लाभार्थी कमल खुताडे तसेच सवादे येथील लाभार्थी संगीता वनशे यांची नवीन सिंचन विहिरीची पाहणी केली. पशुपालक व शेतकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या व योजनाविषयक मार्गदर्शन केले. शेतकरी व पशुपालकांनी जिल्हा परिषदअंतर्गत मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी येथील सरपंच, तालुका कृषी अधिकारी, त्यांचे सहकारी व पंचायत समिती विक्रमगडचे कृषी विस्तार अधिकारी जाधव, पशुसंवर्धनचे डॉ. कारले व परिचर उपस्थित होते.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

Article Tags:
news