Latest Nandurbar News | उत्पन्न वर्षभराच्या पगाराहून अधिक; तरीही मुली म्हणतात, 'शेतकरी मुलगा नको गं बाई!' – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
बामखेडा (जि. नंदुरबार) : नोकरी आहे का? पॅकेज किती? शहरात राहणार का? आपल्याकडे शेती पण आहे ना? असे एक ना असे वेगवेगळे प्रश्न मुलीसह नातेवाइकांकडून विचारले जातात. त्यामुळे ‘शेतकरी नवरा नको ग बाई!’ असा सूर मुलीकडून निघताना दिसतो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मुलांचे लग्नाचे वय होऊनसुद्धा लग्नगाठ बांधली जात नसल्याने अवघड प्रसंग असल्याने शेतकऱ्यांनी आता मुलांना कंपनीमध्ये नोकरीसाठी पाठविण्यास सुरवात केली आहे. वर्षभरातील त्याच्या पगाराची रक्कम तेवढे उत्पन्न शेतात निघते ही वास्तवता आहे. (rural farmer youth migration towards city for job due to get married Latest Nandurbar News)
शहादा तालुक्यातील बहुतांशी शेतीही पूर्णतः बागायती आहे. येथील युवा शेतकरी हायटेक शेती करतात. त्यात पपई, केळी, ऊस, टरबूज, खरबूज, हळद, अद्रक असे नवनवीन पीक घेऊन ती देश-विदेशात निर्यात करत असल्याने हे युवा शेतकरी वर्षाचे उत्पन्न काही लाखो रुपये, तर मोठ्या शेतकऱ्यांचे त्याहून अधिक येत असते. त्यामुळे शहादा तालुक्याला ग्रीन बेल्ट म्हणून संबोधले जाते.
सारंगखेडा, प्रकाशा, तापी नदीवरील, तसेच ब्राह्मणपुरी, दरा येथील शेतकऱ्यांना हरितक्रांती करणारा मध्यम प्रकल्प असल्याने या भागातील शेतकरी अशी विविध बागायती पिके घेत असल्याने शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादनाच्या पैशातून तालुक्याच्या ठिकाणासह आपल्या गावी सर्व सुविधांनीयुक्त बंगले, चारचाकी आलिशान गाड्यांसह विविध सोयीसुविधा उपलब्ध असूनदेखील मुलगी, पिता व नातेवाइकांकडून सरकारी नोकरी आहे का? व पगार किती व गावाकडे शेती किती आहे, असे प्रश्न उपस्थित करत असतात. मुलीकडूनही शेतकरी नवरा नको ग बाई! असे म्हणत मग नोकरीसोबत शेती का हवी, असा प्रतिप्रश्नदेखील होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर वयात आलेल्या आपल्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे.
आजही ग्रामीण भागातील वयात आलेली मुले लग्नापसून मुली मिळत नसल्यामुळे वंचित आहेत. अनेक मुलींना ग्रामीण भागात संसार करण्याची आवड किंवा इच्छा नाही. ग्रामीण भागातील मुलीसुद्धा ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या घरात लग्न करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे पालकांमध्ये अत्यंत चिंताजनक चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन…जाणून घ्या एक यशोगाथा….
हेही वाचा: Jalgaon News : हक्काचे पाणी गेले वाहून; वाया जाणाऱ्या पाण्यावर नदीजोडचीच मात्रा
मुलगा पदवीधर असला, तरी त्यास चांगली बागायती व उत्पन्न देणारी शेती असली, तरी शेतकरी नवरा नकोय, शहरात राहणारा, नोकरी करणारा मुलगा पसंत करणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये ३५ ते ४० वर्षांचे वय होऊनसुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.
मुलांनी करायचं काय?
अशी स्थिती केवळ नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रभर आहे. नोकरीमध्ये मिळणाऱ्या पैशात आणि शहरात राहण्याच्या हौसेखातर ग्रामीण भागातील मुलींना शेतकरी मुलगा पसंत नाही. असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. अगदी शेतकरीराजाही आपली मुलगी नोकरदाराला देण्यासाठी ठाम असतात. मग अशा शेतकऱ्याच्या मुलांनी करायचं काय, असाही सवाल बोहल्यावर चढू पाहणाऱ्या तरुणांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
शेतकऱ्याच्या मुलाचे वय होऊनही त्यांची लग्ने जमत नाहीत. ही मोठी समस्या शेतकरी कुटुंबात असून, शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे. लॉकडाउनमध्ये सर्व क्षेत्रे बंद होती. पण शेतकऱ्याची शेती सुरू होती. याचा विचार करून याविषयी प्रबोधन होणे गरजेचे आहे.
हेही वाचा: Jalgaon News : आणखी 22 शेतकऱ्यांना मिळणार जमिनी; सावकारी पाशातून मुक्ततेसाठी जलद सुनावणी सुरू
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares