चाकणला रास्ता रोको आंदोलन – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
चाकण, ता. १५ : चाकण (ता. खेड) येथील पुणे-नाशिक महामार्गावरील तसेच चाकण-तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. हा प्रश्न केंद्र व राज्य सरकारने सोडविण्यासाठी जनतेचा आक्रोश त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी खेड तालुका वाहतूक कोंडी विरोधी कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
चाकण येथे गेल्या वीस वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दररोज होत आहे. चाकण परिसरात औद्योगिक वसाहत झाल्यामुळे अवजड वाहनामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट झाला आहे. या वाहतूक कोंडीला सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी, कामगार, शेतकरी, विद्यार्थी सारेच वैतागले आहेत. कामगार वेळेवर कंपनीत पोहोचत नाहीत. विद्यार्थी वेळेवर शाळा, महाविद्यालयात जात नाहीत. रुग्ण वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात जात नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव रस्त्यावर जात आहेत.
यावेळी जाहीर सभा घेण्यात आली. त्यात भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजन भाई परदेशी, काँग्रेसचे जमीरभाई काझी, नीलेश कड, राष्ट्रवादी काँग्रेसचे काळुराम कड, मुबीनभाई काझी, खेड तालुका वाहतूक कोंडी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष कुमार गोरे, अनिल देशमुख, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गोरे यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी खेड पंचायत समितीचे माजी सदस्य अमृत शेवकरी, उद्योजक भरत कानपिळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चाकण शहराध्यक्ष राम गोरे, मनोज मांजरे, राहुल नायकवाडी, मनोहर वाडेकर, धीरज मुटके, चंद्रकांत गोरे, अनिल जगनाडे, संजय गोरे, अनिल सोनवणे, प्रीतम शिंदे, लक्ष्मण वाघ, दत्ता गोरे, अशोक जाधव, योगेश देशमुख, गुलाबराव खांडेभराड, मयूर दौंडकर, सचिन पानसरे, बाळासाहेब नाणेकर, योगेश देशमुख, बबन टिळेकर आदी उपस्थित होते.
चाकण वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तत्काळ लक्ष दिले पाहिजे. या मार्गावरील वाहतूक कोंडी देशातील लोकांना सोसावी लागत आहे. देशातील प्रत्येक भागातील नागरिक येथे राहण्यास आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न जर सुटला नाही, तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला. पुणे नाशिक महामार्गावर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक सुमारे पंधरा मिनिटांवर ठप्प झाली. पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना तत्काळ मार्गावरून उठण्यास सांगून आंदोलन मागे घेण्यात आले.
काम लवकर मार्गी लागणार : मेदगे
यावेळी आंदोलनकर्त्यांनी मागणीचे निवेदन पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे समन्वयक दिलीप मेदगे यांना दिले. यावेळी मेदगे म्हणाले, ‘‘पुणे-नाशिक महामार्गाच्या कामाच्या निविदा जानेवारी २०२३ मध्ये निघणार आहेत. मोशी ते चांडोली, राजगुरुनगर मार्गाचे काम होणार आहे. नाशिक फाटा ते चांडोली, राजगुरूनगरपर्यंत सात हजार कोटीचे हे काम आहे. या मार्गावर उड्डाणपूल होणार आहेत. या मार्गावर आठपदरी उड्डाणपूल होणार आहे. त्यानंतर त्यावर सहापदरी उड्डाणपूल पुढील काळातील वाहनांचा विचार करून होणार आहे. पुढील काही वर्षातील वाहतुकीचा अंदाज घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उड्डाणपुलाचा निर्णय घेतलेला आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू झालेली आहे. या मार्गाचे काम मार्गी लागणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया ही सुरू आहे.’’

चाकण (ता. खेड) : पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मारून केलेले रास्ता रोको आंदोलन.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares