बिबट सफारीची डरकाळी जुन्नरमधूनच – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
जुन्नर, ता. १६ : जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीचा प्रश्न मार्गी लागला असून, येत्या शिवजयंतीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वनमंत्री किल्ले शिवनेरीवर बिबट सफारीची घोषणा करणार असल्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील बिबट समस्या, पशुधनावर व माणसांवर होणारे वाढते हल्ले, बिबट सफारी आदी विषयावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात मुंबई येथे मंगळवारी (ता. १३) झालेल्या बैठकीत चर्चा झाली. जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्प हा स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला चालना देणारा असावा. त्यादृष्टीने या प्रकल्पाची आखणी करावी. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. बिबट सफारीचा प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होताच तत्काळ निविदा प्रक्रिया राबवून कामांना सुरवात करावी. विहित वेळेत कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सोनवणे, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. राव तसेच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महायुती सरकारने आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथे मंजूर केलेल्या बिबट सफारीच्या प्रकल्प आराखड्यासाठी दीड कोटीचा निधी मंजूर केला असून, आंबेगव्हाण येथील शंभर एकर वनक्षेत्रात बिबट सफारी प्रकल्प उभा राहणार आहे. पहिल्या टप्प्यात ६० कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
– शरद सोनवणे, माजी आमदार
शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा
जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांना बिबट समस्येला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांवर बिबट हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी दिवसा थ्री फेज व रात्री सिंगल फेज वीज उपलब्ध व्हावी, अशी आग्रही वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली असून, संबंधित खात्याला या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होईल. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे, असे शरद सोनवणे यांनी सांगितले.
मुंबई : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात बिबट समस्येवर चर्चा करताना पदाधिकारी व वन विभागाचे अधिकारी.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares