Weight loss : वजन कमी करायचंय?; ‘या’ लाल पदार्थांचा करा आहारात समावेश – TV9 Marathi

Written by


Updated on: Sep 26, 2022 | 5:18 PM
नवी दिल्ली: वजन कमी (weight loss) करण्यासाठी व्यायाम जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच महत्वाचा ठरतो तुमचा आहार (diet). भरपूर पोषक तत्वं (nutrition) असलेल्या लाल रंगाच्या पदार्थांचा , फळं, भाज्यांच्या (red colour fruits and vegetables) तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. या पदार्थांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. या पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहील. तसेच तुमचे वजन जलदरित्या कमी होण्यासही मदत होईल. हे पदार्थ खूप हेल्दी आणि चविष्टही असतात. तुम्ही आहारात लाल रंगाची कोणती फळे, भाज्या , पदार्थांचा समावेश करू शकता, ते जाणून घ्या.
बीटामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामध्ये ॲंटी-इन्फ्लेमेटरी आणि ॲंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. ते जळजळ होण्याची समस्या दूर करण्यास मदत करतात. बीट हे लोहाने (आयर्न) समृद्ध असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. बीटामध्ये फायबर असते. यामुळे आपले पोट बऱ्याच काळासाठी भरल्यासारखे वाटते. बीटाचे सेवन केल्याने तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. तुम्ही कोशिंबीर, सूप आणि ज्यूसच्या स्वरूपात बीटाचे सेवन करू शकता.
स्ट्रॉबेरी हे अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी फळ आहे. ते जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असते. त्यामध्ये . यात ॲंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. तसेच जळजळ होण्याची समस्या दूर होते. स्ट्ऱॉबेरी ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. त्याचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास देखील मदत मिळते. तुम्ही दररोज 2 ते 3 स्ट्रॉबेरीचे सेवन करू शकता.
टोमॅटोचा वापर बहुतांश भाजी किंवा ग्रेव्हीसाठी केला जातो. त्यामुळे अन्नाची चव वाढण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये फायबर असते. त्याचे सेवन केल्याने आपले पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. टोमॅटोचे सेवन केल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते. त्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. तुम्ही दररोज टोमॅटोचा रस पिऊ शकता किंवा टोमॅटो खाऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात लाल मिरचीचाही समावेश करू शकता. लाल मिरची ही मेटाबॉलिज्म वेगवान करण्यास मदत करते. तसेच फॅट बर्नही वेगाने होते. तुम्ही रोज लाल मिरचीचे सेवन करू शकता. मात्र ती खूप तिखट असल्याने प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच मिरच्या खाव्यात.
(टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares