काँग्रेसला गळा काढून व राष्ट्रवादीला गल्लोगल्ली हल्लाबोल करण्याचा नैतिक अधिकार नाही-रघुनाथ पाटील – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
चोपडा- 2006- 2014 पर्यत म्हणजे ८ वर्षे स्वामीनाथन आयोगाचा अहवाल हा कॉंग्रेस व राष्ट्रवादी जवळ असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी का लागू केला नाही, असा सवाल उपस्थित करून बुधवारी  काँग्रेस गळा बाहेर काढून मोठमोठ्या आवाजात बाहेर बोलत असून राष्ट्रवादी गल्लोगल्ली हल्लाबोल मोर्चा काढत असली तरी त्यांना काहीच अधिकार नाही, असा टोला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे.
 
चोपडा पंचायत समिती आवारात राज्यव्यापी हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा दाखल झाली. त्या यात्रेत जाहीर सभेच्या माध्यमातून रघुनाथ पाटील यांनी विरोधी पक्षावर व सत्ताधारी पक्षावर आसूड ओढले होते. 
 
 यावेळी मंचावर,लोकासंघर्ष मोर्चाचे प्रतिभा शिंदे,बळीराजा संघटनेचे गणेश जगताप,
किशोर ढमाले,सचिन धांडे, काका जगताप,सुभाष काकूंस्ते,कालिदास आपेट,नाना नानखिले,संजय शिरसाठ, प्रकाश बारेला,गाजू बारेला,प्रदीप पाटील,लोकेश लाटे,आदी उपस्थित होते.तर हजारो च्या संख्येने तालुक्यातील आदिवासी शेतकरी उपस्थित होते.
 
यावेळी रघुनाथ पाटील यांनी आपल्या शेतकरी संवाद सभेत बोलताना सांगितले की,२००६ साली काँग्रेस व राष्ट्रवादी ने शेतकर्या साठी स्वामी नाथन आयोग दिला असता तर शेतकऱ्यांना कर्जमाफी ची गरज राहिली नसती. उत्पादन खर्चाचा दीडपट भाव शेतकऱयांना मिळाला असता.त्याच प्रमाणे आता चे राज्य कर्ते यांचा देखील उधोग शेतकरी विरोधी असून व्यापारी लोकांना फायद्याचे धंदे त्यांनी चालविले आहेत.काँग्रेस ,राष्ट्रवादी,भाजप व शिवसेना विधानसभेत शेतकऱयांचे हिताचे ठराव का पास करत नाहीत.शेतकरी विरोधी यांचे षड्यंत्र असून कारखानदार यांचे बाप लागतात काय अशी टीका यावेळी रघुनाथ पाटील यांनी केली.त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक वज्रमुठ तयार करून राज्यकर्त्यांच्या खुर्च्या रिकाम्या करण्याची वेळ आली असून आपण सर्वांनी तयार राहा,असेही सांगितले.
 
१४ मे ला महाराष्ट्रच्या लाखभर शेतकरी जेल भरो करणार-
आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास आपल्या खुर्च्या रिकाम्या केल्या शिवाय राहणार नाहीत.चोपडा तालुक्यातून तीन हजार आदिवासी शेतकरी जेल मध्ये जातील.माणसाच्या लढाई साठी वनजमिनी चा कायद्यात आदिवशी ना अधिकार मिळाले पाहिजे.ही यात्रा चाळीस संघटना ची एकत्रित यात्रा आहे.जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातुन जेलभरो करू असेही लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी आपल्या भाषांनातून सांगितले. यावेळी लोकेश चाटे यांनी सूत्रसंचलन तर प्रकाश बारेला यांनी प्रस्तावना केली होती.

कोण काय म्हणाले… 
किशोर ढमाले (धुळे)-
पिढ्या न पिढ्या आदिवासी आपल्या वनजमिनी साठी आंदोलन चालू आहे. फडणवीस सरकार आदिवासींच्या विरोधात आहे.केंद्र आणि राज्य सरकारने आदिवासींना सात बारा दिलेले नाहीत.अजूनही त्या जागांवर वनविभाग मालक आहे.आम्ही आत्महत्या करणार नाहीत.कारण आदिवासी हा मूळमालक आहे.
 
शिवाजीराव नादखिले (शेतकरी संघटना)- जागृती यात्रा हक्काचा साठी यात्रा, भारतीय घटनेने दिलेले अधिकार मिळविण्यासाठी ही यात्रा.शेतकरी विरोधी कायदा रद्द झाला पाहिजे. किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे.शेतकऱ्यांनी हक्क मागून जगायचे आहे.

प्रतिभा शिंदे- (लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्ष)- दहा वर्षात आदिवासी कायदयाची तीन टक्के देखील कायदा झाला नाही.आम्ही सर्व शेतकरी आहोत,आमच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. जमिनीचे मूळ मालक आम्ही आहोत.सरकार ने आदिवासी बाबत धोरण आखले पाहिजे.
 
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा… संबंधित फोटो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares