पावसानं रडवलं, पीक सडवलं; ३५.२२ लाख हेक्टर शेती पाण्याखाली – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
शनिवार १७ डिसेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 09:49 AM2022-10-20T09:49:03+5:302022-10-20T09:49:25+5:30
सुनील चरपे  
नागपूर : मुसळधार व अति मुसळधार पावसामुळे, तसेच पुरामुळे जून ते १७ ऑक्टाेबर या काळात राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३८ लाख ४४ हजार ८२६ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे ३५,२१,८६८.४९ हेक्टरमधील विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक हातचे गेल्याने शेतकरी  हेलावून गेला आहे. सर्वाधिक फटका कापूस व साेयाबीनच्या पिकाला बसला असून, फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांचेही माेठे नुकसान झाले आहे. जून ते ३१ ऑगस्ट या काळातील भरपाईसाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे ४,६३४.४६ काेटींची मागणी केली आहे. 
काही जिल्ह्यांत गाेगलगायींचा प्रादुर्भाव झाला हाेता. यात बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांसाेबत नागपूर व अमरावती जिल्ह्यांचाही समावेश आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करताना बीडच्या  १२,९५८ शेतकऱ्यांचे ३,८२२.३५ हेक्टर, लातूरमधील १,०८,६३६ शेतकऱ्यांचे ६८,३८५ हेक्टर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४०१ शेतकऱ्यांचे २८३.३३ हेक्टरमधील नुकसान झाल्याचे दाखविले आहे. बीड जिल्ह्यासाठी ५१९.८४ लाख, लातूरसाठी ९,३००.३६ लाख व उस्मानाबादसाठी ३८.६० लाखांची कृषी विभागाने मागणी केली. 
तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
अतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. सततच्या पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला असून, पावसामुळे मागील दोन ते तीन दिवसांत शेतीचे जे नुकसान झाले, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जून ते ऑगस्ट या काळातील नुकसान
जून ते ३१ ऑगस्ट या काळात ३४ जिल्ह्यांमधील ३८,४४,८२६ शेतकऱ्यांचे ३१,७१,३३८.४९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. भरपाईसाठी ४,५३,५८८.८० लाखांची सरकारकडे मागणी केली आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे ३०,१६,४४२ शेतकऱ्यांच्या २६,२१,६९२.१६ हेक्टरमधील तर पावसामुळे ८,२८,३८४ शेतकऱ्यांच्या ५,४९,६४६.३३ हेक्टर पीक नुकसानीचा समावेश आहे. भरपाईसाठी ३,७८,०१९ लाख तर पावसाने झालेल्या भरपाईसाठी ७५,५६९.४३ लाखांची मागणी केली आहे.
सप्टेंबर व ऑक्टाेबरमधील नुकसान
१ ते ३० सप्टेंबर काळात पावसामुळे १२ जिल्ह्यांमधील ५२ तालुक्यांतील २,३७,४३४ हेक्टरमधील तर १ ते १७ ऑक्टाेबर या काळात १६ जिल्ह्यांमधील ५२ तालुक्यांमधील १,१३,०९१ हेक्टरमधील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान कापूस, साेयाबीन, मका या पिकांसह संत्रा, माेसंबी व केळी या फळपिकांचे झाले आहे. 
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares