हिंदी | English
शुक्रवार १६ डिसेंबर २०२२
FOLLOW US :
शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 07:40 PM2022-08-29T19:40:33+5:302022-08-29T19:40:56+5:30
कडा (बीड): शेतातून घराकडे बैलगाडी घेऊन येताना नवीन जोडी असल्याने उधळली. यात बैलगाडी पलटी होऊन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. रविवारी सायकांळी या शेतकऱ्याचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुभाष आप्पा महाडिक असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील महाडिक वस्ती येथे शेतकरी सुभाष महाडीक राहतात. त्यांनी नुकतीच नवीन बैलजोडी खरेदी केली. पोळ्याला मिरवणूक देखील मोठ्या आनंदात पार पडली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी शनिवारी जनावरांना चारा आणण्यासाठी ते बैलगाडी घेऊन शेतामध्ये गेले होते. चारा घेऊन घराकडे येताना बैलजोड अचानक उधाळली. यात बैलगाडी उलटल्याने शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांना अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
FOLLOW US :
Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

Article Tags:
news