बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून भावाने केली आत्महत्या – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
शनिवार १७ डिसेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 05:03 PM2022-10-31T17:03:22+5:302022-10-31T17:05:05+5:30
केज (बीड) : गत तीन वर्षापासून शेतीच्या नापिकीमुळे  बहिणीच्या लग्नाचे कर्ज फेडावे कसे? या चिंतेने भावाने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील देवगाव येथे रविवारी घडली. दीपक बालासाहेब मुंडे असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील देवगाव येथील बालासाहेब मुंडे यांच्यावर शेतीसाठीचे बँकेचे कर्ज आणि मुलीच्या लग्नासाठी घेतलेले खाजगी कर्ज होते. मात्र, मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीपीमुळे कर्ज फेडता येत नव्हते. यातून बाळासाहेब शिंदे यांचा २० वर्षीय मुलगा दीपक चिंतेत असे. कर्ज कसे फेडणार या विवंचनेत दिपकने रविवारी ( दि. ३१) दुपारी २:०० वाजेच्या सुमारास घरातील पत्र्याच्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. 
या प्रकरणी पांडुरंग रामा मुंडे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू  क्र. ६/२०२२ फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहाय्य पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरघाट दूरस्थ पोलिस चौकीतील हेडकॉन्स्टेबल अभिमान भालेराव हे पुढील तपास करीत आहेत.
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares