बोलून बातमी शोधा
ऊर्से, ता.१६ : द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूने संपादित केलेल्या ३० मीटर रस्त्याच्या संपादनास येथील शेतकऱ्यांचा विरोध असून हे संपादन तत्काळ रद्द करावे याबाबत भारतीय किसान संघाने पीएमआरडीए कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. पीएमआरडीएकडून द्रुतगती मार्गालगत दोन्ही बाजूने ३० मीटर रस्त्याचे संपादन करण्यात आले आहे. तसेच झोन दाखविल्यावर नोंदही करण्यात आली आहे. दोन्ही बाजूने एवढे मोठे संपादन केल्याने शेतकरी संभ्रम अवस्थेत आहेत. एमएसआरडीए, पीएमआरडीए व शेतकरी यांच्यात लवकरच सम्वन्वयासाठी बैठक आयोजित करावी. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनस्तरावर योग्य तो हिताचा निर्णय घ्यावा अन्यथा शेतकरी गांधीवादी तत्वाने भारतीय किसान संघास आंदोलन करावे लागेल. असा इशारा भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार व तालुकाध्यक्ष विश्वनाथ शेलार यांनी दिला आहे. द्रुतगती मार्गावर सध्या विविध कामासाठी जमीन संपादन करण्याचे कामे सुरू आहेत. अगोदरच बंदिस्त जलवाहिनी योजना, हायपुर लुप व इतर काही योजनेसाठी जमीन संपादित करण्याच्या विचाराधीन शासन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाल्याने त्यांच्याशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करावा अशी मागणी भारतीय किसान संघासह शेतकरी वर्ग करीत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

Article Tags:
news