मुंबई | शेती करत असताना शेतकऱ्यांना विजेअभावी सिंचनाची मोठी समस्या निर्माण होते. शेतकऱ्यांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सौर कृषि पंप योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी अनुदान देते. ही योजना अटल सौर कृषी पंप योजना (Solar Pump Yojana) म्हणूनही ओळखली जाते. शेतकऱ्यांना 1,00,000 सौरपंप उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून हे लक्ष्य 3 वर्षांसाठी ठेवण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही. कारण या योजनेसाठी सरकारने ठराविक लक्षांक आणि कोटा ठरवून दिलेला आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना पंपाच्या किंमतीच्या ९५ टक्के इतके भरघोस अनुदान देते. लाभार्थी शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के रक्कम खर्च करावी लागते. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसेच या शेतकऱ्यांकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसावी. 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप तर 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.

Article Tags:
news