Maharashtra budget 2022 session LIVE : अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करीत आहेत – Zee २४ तास

Written by

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाचे ताजे अपडेट येथे वाचा…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाचे ताजे अपडेट येथे वाचा…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाचे ताजे अपडेट येथे वाचा…
11 Mar 2022, 15:17 वाजता
– 2021-22 वर्षाच्या सुधारित अंदाजात वाढ
– महसुली जमा 4लाख 3 हजार 427 कोटी
– महसुली खर्च 4 लाख 27 हजार 780 कोटी अंदाजित
– 24 हजार 353 कोटी महसुली तूट येत आहे
अर्थव्यवस्थेची गती मंदावलीय, मात्र विकासाच्या पंचसुत्री अंतर्गत विकास हा करणारच. संतांच्या कार्यामुळे शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला आणि त्यांच्या जाणिवा समृद्ध आणि पुरोगामी महाराष्ट्र घडविणार याचा मला विश्वास आहे.
11 Mar 2022, 15:07 वाजता
– सीएनजी – मूल्यवर्धित कर १३ टक्के वरून ३ % केला जाईल. ]यामुळे सीएनजी वरील सेवा दर कमी होईल. 
– सर्व नागरिकांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक वायूवरील सीएनजी – मूल्यवर्धित कर १३ टक्के वरून ३ % केला जाईल
– यामुळे राज्यात पावसाचे 800 कोटी रुपयांची वसुली घट होईल. 
– बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी या व्यवसायात गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियमांच्या सूट 
– काळानुसार विचारात आलेला मनोरंजन कर, सामाजिक कार्यासाठी निधी देण्याचा कालावधी एक वर्ष
 
11 Mar 2022, 15:00 वाजता
नवी मुंबईत महाराष्ट्र भवनासाठी १०० कोटी निधी
सावित्रीबाई फुले यांच्या पुणे, भिडे वाडा येथील स्मृतिस्थळासाठी १०० कोटी 
11 Mar 2022, 14:58 वाजता
– राज्यात १८ अति जलद न्यायालय
– नक्षली भागात कमांडो भत्ता ४ हजार वरून ८ हजार
– अष्टविनायक विकास योजनेसाठी ५० कोटी
 
11 Mar 2022, 14:51 वाजता
पुणे, नागपूर, मुंबई येथे समाज सुधारकांची स्मारके बांधण्यात येणार
अजिंठा, वेरूळ या पर्यटन स्थळाला चालना देण्यासाठी निधी
सैन्य दलाच्या धर्तीवर पोलीस दलासाठी रुग्णालये    
11 Mar 2022, 14:47 वाजता
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकासासाठी १५ हजार कोटी
इमारत बांधणीसाठी १ हजार कोटी
नाबार्डनं मंजूर केलेल्या रस्त्यांची आणि पुलांची कामं पूर्ण करण्यात येतील
11 Mar 2022, 14:43 वाजता
३ लोक ३० हजार जणांना  रोजगाराच्या नवीन संधी
नवीन इलेकट्रीक धोरण, १५७ टक्के प्रमाण वाढले आहे.
कोविद काळात ज्या महिला निराधार झाल्या. त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांना कर्ज मिळणार त्याची परतफेड सरकार करणार    
11 Mar 2022, 14:37 वाजता
– स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग प्रस्थावित
– तृतीयपंथीयांना कर्जाची सुविधा तसंच ओळखपत्र, रेशनकार्ड
– ओबीसीच्या नव्या आयोगासाठी खर्चाची तरतूद 
– एसटी महामंडळाच्या नव्या गाड्या प्रस्तावित आहेत.
– शिर्डी विमानतळावर रात्रीच्या उड्डणांची सुविधा सुरु
– रत्नागिरी १०० कोटी 
– गडचिरोली येथे नवीन विमानतळ प्रस्तावित  
11 Mar 2022, 14:35 वाजता
सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशू रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय
हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधूदुर्ग भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील. 
अकोला व बीड येथे स्त्री रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. 
11 Mar 2022, 14:35 वाजता
समृद्धी महामाग्रे नागपूर ते गडचिरोली विस्तार 
 
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares