Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या ‘त्या’ विधानावरून भिडेंना राज्य महिला आयोगाची नोटीस
Sambhaji Bhide | पुणे : संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडे (Sambhaji Bhide) यांना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?,” यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे, असं भिडे यांनी म्हटलं. यावरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांन उधाण आलं आहे. भिडेंनी केलेल्या विधानावरून त्यांना महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारी दखल घेणे याकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि समाजिक दर्जाला ठेच पोहचविणारे आहे, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.
आपल्या वक्तव्याबाबत समाजातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. तरी कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भुमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार तात्काळ सादर करावा.
तसेच, नोटीस ट्विटरवरून शेअर करत, साम टीव्हीच्या महिला पत्रकाराला तू टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते, त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाचं मोजमाप नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा, असं कॅप्शनही रूपाली चाकणकर यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> Join WhatsApp Group WhatsApp Group मध्ये सामील व्हा.
>>> आपल्या परिसरातील बातम्या पाठवा { बातमी पाठवा WhatsApp Group } <<< >>> आपल्या परिसरातील बातम्या पाठवा { बातमी पाठवा WhatsApp Group } <<<
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
Login to your account below
Please enter your username or email address to reset your password.