बोलून बातमी शोधा
आजरा महाविद्यालयाचे चित्रानगरला शिबिर
आजरा, ता. १५ ः आजरा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन चित्रानगर येथे केले आहे. २० ते २६ दरम्यान शिबिर होईल. आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होईल. जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास नाईक अध्यक्षस्थानी आहेत. गटारीची स्वच्छता, वनराई बंधारा, हळदी कुंकू, आरोग्य शिबिर, ग्रामसफाई, स्मशानघाट स्वच्छता हे उपक्रम होतील. कृषी कायदे २०२२ आणि शेतकरी आंदोलन हा विषय डॉ. ज्ञानराज चिघळीकर मांडतील. सतीश सुतार यांची हिंदी- मराठी गीतांची मैफील, डॉ. नवनाथ शिंदे यांचा तुका आकाशा एवढा, श्रीमती मिना मंगरुळकर यांचे महिलांची सुरक्षितता या विषयावर व्याख्यान होतील. शिबिराच्या समारोपाला जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी अध्यक्षस्थानी, तर नायब तहसीलदार डी. डी. कोळी प्रमुख पाहुणे असतील. संस्थेचे संचालक, प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील उपस्थित राहणार आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

Article Tags:
news