राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्याचे सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. याच सर्व विषयावरून महाविकास आघाडीकडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मविआतील नेत्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याच मोर्च्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मविआचा हा मोर्चा अशस्वी आहे, कारण पाहिजे तेवढी गर्दी झाली नाही, अश्या शब्दात त्यांनी मोर्च्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले फडणवीस?
आझाद मैदान एवढी तरी गर्दी मविआने जमवायला हवी होती, यावरुन मविआच्या मोर्चाला लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही, असं दिसून येतय, त्यात मविआ महामोर्चा काढण्यात अशस्वी असल्याचे, देवेंद्र फडणवीस यांनी महामोर्चावरील आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
या महामोर्चाला आज दुपारी १२ ला सुरुवात झाली, या मोर्चात मविआच्या पक्ष कार्यकर्त्यांसह डाव्या विचारांच्या काही संघटना देखील सहभागी असल्याचं दिसून आलं. यात काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे झेंडे दिसत होते, शिवसेनेचे भगवे झेंडे देखील दिसून आले, तर निळ्या झेंड्यांचीही उपस्थिती होती. मात्र या मोर्चात सुषमा अंधारे दिसून आल्या नाहीत. सोबतच माविआमधील काही नेते देखील नाराज असल्याचे दिसुन आले.
Lokshahi Marathi Ⓒcopyright2022

Article Tags:
news