Amravati :अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात आग, दोन बालकं जखमी … – ABP Majha

Written by

By: प्रणय निर्बाण, एबीपी माझा | Updated at : 25 Sep 2022 03:02 PM (IST)
Edited By: निलेश झालटे
Amravati Hospital Fire ( Image Source : Getty )
Amravati Hospital Fire: अमरावतीमधील जिल्हा स्त्री रुग्णालयात (Amravati Women Hospital) आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. लहान मुलांच्या बालक अतिदक्षता कक्षातील व्हेंटिलेटर मशीनला अचानक आग लागली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दोन लहान बालकं किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल रुग्णालयात दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेची सखोल चौकशी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अमरावती स्त्री रुग्णालयात आज सकाळी 9 वाजता लहान मुलांच्या बालक अतिदक्षता कक्षातील व्हेंटिलेटरला अचानक शॉटसर्किटमुळे आग लागली. यावेळी त्या वार्डात तब्बल 37 लहान बालक उपचार घेत होते. डॉक्टरांचा राउंड सुरू होता. आग लागल्याचं पाहून तातडीने सगळ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी बालकांना बाहेर काढले. धुरामुळे बालकांना त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने दुसऱ्या वार्डात हलविले तर दोन बालकांना इजा झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर लहान मुलांना तातडीने दुसऱ्या वार्डात शिफ्ट कऱण्यात आले. दोन बालके किरकोळ जखमी झाली असून तातडीने त्यांना पंजाबराव देशमुख रुग्णालयात हलविले आहे.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली आहे.
सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
या घटनेची सखोल चौकशी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

News Reels

या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार यशोमती ठाकूर रुग्णालयात पाहणी करण्यासाठी दाखल झाले. शिवाय भाजप आमदार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा रुग्णालयात पाहणी करण्यासाठी दाखल झाले. खासदार नवनीत राणा यांनी देखील हॉस्पीटलची पाहणी केली.  
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. या घटनेची सखोल चौकशी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Buldhana: बुलढाण्यातील केमिकल कंपनीला हरित लवादाचा झटका; ठोठावला 250 कोटींचा दंड, प्रदूषण पसरवल्याचा ठपका
‘आता माझ्यासोबत अनुभवी फडणवीस, त्यामुळं काही कमी पडणार नाही’; माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडून महत्वाच्या घोषणा
Maha Vikas Aghadi Morcha Today Live Updates : उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी, ड्रोनद्वारे पोलिसांची मोर्चावर नजर
Maharashtra News Live Updates : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा
Sanjay Raut : आज आंदोलनाची पहिली ठिणगी, यातून वणवा पेटेल; संजय राऊतांचा इशारा
Vidarbha Weather : नागपूरसह विदर्भात आजही राहणार ढगाळ वातावरण
Pune Swiggy News : बॉस लई खास! टीमसाठी केली तब्बल 71 हजार रुपयांची फूड ऑर्डर
Uddhav Thackeray MVA Morcha : मविआच्या मोर्चात उद्धव ठाकरेंवर पुष्पवृष्टी
Bilkis Bano: बिल्किस बानो यांना सर्वोच्च न्यायालयाच्या धक्का, सामूहिक अत्याचार करणाऱ्यांची सुटका करण्याविरोधातील याचिका फेटाळली 
Prakash Ambedkar Nashik : शिव-भीमशक्ती युतीवर प्रकाश आंबेडकरांचे नाशिकमध्ये महत्वाचं वक्तव्य, म्हणाले… 
Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज, अधिकारी केंद्राकडे रवाना, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Kolhapur Crime : पोलिस अधिकाऱ्याकडून पोलिस ठाण्यातच महिला काॅन्स्टेबलकडे शरीरसुखाची मागणी! कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares