Dandruff: केसातला कोंडा कसा दूर कराल? कोंडा का तयार होतो? – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
प्रातिनिधिक छायाचित्र
अनेक लोकांना केसातल्या कोंड्यामुळे होणाऱ्या त्रासाचा सामना करावा लागत असतो. ही समस्या वारंवार डोकं वर काढत असते.
पण हा कोंडा प्रामुख्यानं एका बुरशीमुळे होत असतो, हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.
साधारणपणे आपल्या सर्वांच्याच त्वचेवर कोंडा हा नैसर्गिकरित्या असतोच. मात्र त्यापैकी अर्ध्या लोकांसाठी तो समस्येचं कारण ठरत असतो.
त्यातही एक तृतीयांश लोकांमध्ये ही संख्या एवढ्या जास्त प्रमाणात वाढते की, त्यांचं बाहेर येणं जाणंही कठीण होतं.
कोंडा ही समस्या तशी अगदीच सर्वसामान्य आहे. मात्र, अनेकदा सामाजिक स्तरावर ही समस्या तुमच्या आत्मविश्वासाला मारक ठरत असते.
कोंड्यामुळे अपमानास्पद भावना मनात येत असल्यामुळं अनेकांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाणं किंवा लोकांना भेटणंही कमी केलं असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
पण याला लगेचच घाबरून जाण्याचीही काही गरज नाही. कोंडा दूर करण्याचे काही चांगले उपायदेखील आहेत.
कोंड्यासाठी सामान्यपणे जबाबदार असलेलं फंगस म्हणजे, मालासेजिआ ग्लोबोसा हे आहे. प्रामुख्यानं या फंगमुळेच ड्रँड्रफची समस्या उद्भवत असते.
हे फंगस त्वचा आणि केसांमधून तेल शोषून घेतं. पण तसं करताना त्याचवेळी ते ओलेइक अॅसिड तयार करतं. त्यामुळं केसांमध्ये खाज सुटू शकते.
काही जणांच्या प्रतिकारशक्तीची प्रतिक्रियाही ते थांबवतं. त्यामुळं डोक्याच्या त्वचेवरील कोरड्या पापुद्र्याचे थर निघायला सुरुवात होते.
फोटो स्रोत, Getty Images
वायू प्रदूषणामुळं याचं प्रमाण आणखी वाढत जातं, तर सूर्यकिरणांमधून मिळणाऱ्या यूव्ही किरणांद्वारे त्यावर नियंत्रण मिळवणं सोपं ठरत असतं.
कोंड्यापासून सुटका हवी असेल तर केसांच्या मुळांशी तेल लावण्याचा पर्यायदेखील फार चांगला नाही.
मालासेजिआ ग्लोबोसा हे फंगस तुमच्या केस आणि त्वचेतील नैसर्गिक तेल शोषून घेत असतं. अशा परिस्थितीत हे तेल स्वच्छ करणं किंवा धुणं अधिक फायद्याचं ठरू शकतं.
मात्र, काही केमिकल असेही आहेत, ज्यांच्या मदतीनं हे नष्ट केलं जाऊ शकतं. त्यात सर्वात परिणामकारक केमिकल म्हणजे मायकोनाझोल आणि केटोकोनाझोल हे आहेत.
काही शाम्पूमध्ये केटोकोनाझोलचा वापर केला जातो. मात्र, मायकोनाझोल सध्या केवळ त्वचेवरच लावल्या जाणऱ्या क्रिममध्ये उपलब्ध आहे. मात्र, प्राण्यांसाठीच्या काही शाम्पूमध्ये मायकोनाझोल हे केमिकल असतं.
अनेकदा असं वाटू शकतं की अँटिफंगल शाम्पूचा परिणाम ठरावीक काळानंतर राहत नाही. त्यामुळं वेळोवेळी हे पर्याय पुन्हा-पुन्हा वापरण्याची गरज पडत असते.
फोटो स्रोत, Getty Images
कोल टार शाम्पू त्वचेच्या टर्नओव्हरची प्रकिया मंदावू शकतो. त्याशिवाय सॅलिसायलिक अॅसिडयुक्त शाम्पू फ्लेक्सपासून सुटका मिळण्यास मदत करू शकतात.
तसंच, झिंक किंवा सेलेनियमयुक्त शाम्पूही फंगस रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. अशा परिस्थितीत अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात.
संशोधक मालासेजिआच्या जेनेटिक कोडचं सिक्वेंन्सिंग करून त्याच्या मदतीने या फंगसपाटून सुटका मिळण्यासाठी अधिक फायदेशीर औषधं विकसित करण्यासाठी काम करत आहेत.
डोक्यात कोंडा होणे हा अगदी सर्वसामान्य त्वचारोग आहे.
साधारणपणे कोंड्याचे पापुद्रे गडद रंगाच्या केसांमध्ये स्पष्टपणे आढळतात. जेव्हा ही समस्या वाढते तेव्हा डँड्रफ खांद्यावरही दिसू लागतो.
अशा परिस्थितीत केसांच्या मुळाशी कोरडेपणा जाणवू शकतो आणि तुम्हाला खाजही येऊ शकते.
यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही एखादा अँटीडँड्रफ शाम्पू वापरायला हवा. त्यात तुम्हाला अनेक प्रकारचे ब्रँड मिळतील.
खालील केमिकल असलेले शाम्पू कोंडा रोखण्यासाठी खरेदी करू शकता.
कोंडा खूप जास्त प्रमाणात असेल तर जवळपास एक महिना अँटी डँड्रफ शाम्पू वापरून पाहा. तुम्ही गरज वाटल्यास एकापेक्षा जास्त शाम्पूही वापरून पाहू शकता. त्यामुळं तुमच्यासाठी कोणता शाम्पू अधिक योग्य आहे, हे तुमच्या लक्षात येईल.
कोंडा होण्याचं कारण
कोंडा स्वच्छता व्यवस्थित न ठेवल्यामुळे होतो असं नाही, मात्र केस स्वच्छ ठेवले नाही तर मात्र तो उठून दिसत असतो. तणाव आणि थंडीच्या वातावरणात कोंडा वाढण्याची शक्यता आणखी वाढते.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares