Holi 2022 : होळीनिमित्त पत्नीकडून पतीला मिळतो काठीने मार, सांगली जिल्ह्यातील मिरजमधील – ABP Majha

Written by

By: कुलदीप माने, एबीपी माझा | Updated at : 19 Mar 2022 03:59 PM (IST)
Edited By: धनाजी सुर्वे
Holi 2022
Holi 2022 :  महाराष्ट्रात होळीच्या सणानिमित्त विविध भागात विविध परंपरा जपल्या जातात. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्येही अशीच एक अनोखी परंपरा आहे. मिरजमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी बायका आपल्या पतीला काठीने मारतात. गेल्या पाच ते सहा पिढ्यांपासून मिरजमध्ये राहणाऱ्या गोसावी  समाजामध्ये होळी सनानिमित्त ही अनोखी परंपरा जपली आहे.
होळी पेटवलेल्या राखेत एक काठी उभा केली जाते. या काठीला पैसे आणि भगवा ध्वज लावला जातो. गोसावी समाजातील महिला या काठीचे संरक्षण करत असतात. या काठीचे पैसे पळवण्याचे आव्हान पुरुषांना देण्यात आलेले असते. हे पैसे पळवण्याचा पुरुष प्रयत्न करत असतात. परंतु, पत्नीकडून काठी आणि पैसे पळवून नेण्यास विरोध केला जातो. पुरूष काठी जवळ आले की,  स्त्रिया त्यांना काठीने झोडपून काढतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी हा खेळ खेळला जातो. महिलांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने हा खेळ खेळण्यात येतो.  
होळीचा सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुर्गामातेच्या मंदिरासमोर मिरजेतील गोसावी वस्तीत हा आगळा वेगळा खेळ खेळला जातो. होळीच्या रंगाने माखलेले स्त्री आपल्या पतीला काठीने मारत असतानाचे हे दृश्य पाहण्यासारखे असते. या खेळात महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा खेळ खेळण्यात आला नव्हता. परंतु, यंदाच्या होळी सनानिमित्त मोठ्या उत्साहात हा खेळ खेळण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोसावी समाजातील महिलांनी आपल्या पतीला काठीने झोडपून काढले. 
मिरजेतील गोसावी समाजाची ही परंपरा आहे. त्यांच्या वस्तीतील दुर्गामाता मंदिरासमोर होळीच्या दुसऱ्या दिवशी हा खेळ मोठ्या भक्तिभावाने खेळला जोतो. गोसावी समाजातील पुरुष आणि स्त्रिया बाहेर गावी असले तरी होळीसाठी ते मिरजेत येत असतात. या दिवशी  त्यांचे नातेवाईकही हा खेळ पाहण्यासाठी येत असतात. 

News Reels
“आमच्या गोसावी समाजात हा खेळ खेळला जातो. वर्षभर महिलांना आम्ही रागावत असतो. परंतु, या खेळाच्या निमित्ताने आमच्या बायका आम्हाला काठीने मारतात आणि आनंद घेतात. आम्ही ही आनंद घेत त्यांचा मार खात असतो. आमची ही परंपरा आहे, असे  अजय गोसावी यांनी सांगितले.  
महत्वाच्या बातम्या
इथून पुढे कोणताही ऐतिहासिक बायोपिक करणार नाही : सुबोध भावे 
Maharashtra Tripura Violence: प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढांसह 7 जणांची निर्दोष सुटका, काय आहे प्रकरण
Maharashtra News Live Updates : टिपरच्या धडकेत यवतमाळमध्ये दुचाकीस्वार जागीच ठार
बारामतीत कायद्याचं राज्य आहे का? मद्यधुंद तरुणांची गुंडागर्दी; अनेक गाड्या फोडल्या, कोयते दाखवत धिंगाणा, दृश्य सीसीटीव्ही कैद
Winter Assembly session : नागपूर मनपात नगरविकासचे सचिवालय; प्रधान सचिवांसह इतर अधिकाऱ्यांची व्यवस्था
महामोर्चात पैसे देऊन माणसं जमवली; व्हिडीओ शेअर करत भाजपचा आरोप, फडणवीस म्हणाले, व्हिडीओ लाजिरवाणा, अजित पवारांनी आरोप फेटाळले… 
Majha Katta : …त्यामुळे महापुरूषांवर सतत टीका होते; ज्येष्ठ लेखक डॉ. रावसाहेब कसबेंनी माझा कट्ट्यावर सांगितलं कारण 
World Cup 2023  : …तर 2023 चा विश्वचषक भारतात होणार नाही? जाणून घ्या काय आहे कारण
Mahavikas Aghadi Protest: कर्तव्यदक्षतेला सलाम! मुलीचं लग्न सोडून मुंबईचे पोलिस आयुक्त फिल्डवर, मंत्र्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव
Maruti Suzuki Omni: मारुती सुझुकीची ओम्नी लवकरच इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये येणार? या कारशी होणार स्पर्धा

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares