Nagpur Maoist Threat: अधिवेशनात गर्क असलेल्या सरकारला माओवाद्यांचा इशारा; आमदारासह प्रशासनाला धमकी – Times Now Marathi

Written by

नागपूर :   उद्यापासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session)माओवादीवाद्यांच्या टार्गेटवर आहे. गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli News)सुरजागड (Surjagad) लोह खनिज खाणीचा (mines) विस्तार त्वरित रद्द करण्यात यावा, असा इशारा माओवादीवाद्यांनी राज्य सरकारला दिला आहे. यामुळे काही काळ शांत बंसलेले माओवादी पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.  (Maoist warning to Govt; Threat to administration including MLA)
अधिक वाचा  : इंडियन ऑइल कंपनीत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर वर्षभरापासून लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. नुकतीच खाणीच्या विस्ताराबाबत जनसुनावणी घेण्यात आली. मात्र, स्थानिकांचा विरोध झुगारून सरकार बळजबरीने उत्खनन करीत आहे, असा आरोप करीत उत्खनन तत्काळ बंद करावे अन्यथा बघून घेऊ, अशी धमकी माओवादीवाद्यांनी स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह प्रशासनाला दिली आहे. माओवाद्यांचा प्रवक्ता श्रीनिवासने याबाबत एक पत्रक काढले आहे.

अधिक वाचा  : Suvichar: या प्रेरणादायी विचारांनी करा दिवसाची सुरुवात
सूरजागड परिसरात आदिवासींच्या पारंपरिक देवी देवतांचे अस्तित्व आहे. त्या भागात दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. मात्र, लोहखाणीमुळे या भागाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. येथील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट सुरू आहे. अवजड वाहतूकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले. टेकडीवरील गाळ शेतात आणि नदी नाल्यात साचत असल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. यामुळे अजय टोप्पो या आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केली.परंतु सरकार आणि कंपनी पोलीस बळाचा वापर करून लोकांचा विरोध दडपण्याचा काम करत आहे. विरोध करणाऱ्या स्थानिकांना तुरुंगात डांबण्यात आले. पांडू नरोटेला सुध्दा याच कारणांमुळे देशद्रोहाच्या कलमाखाली अटक करण्यात आली आणि तुरुंगात त्याचा मृत्यू झाला असल्याचं माओवादीवाद्यांकडून सांगण्यात आलं आहे. 
अधिक वाचा  : फिफा वर्ल्डकप फायनल कुठे आणि कशी बघाल?
आम्ही सुरुवातीपासूनच याला विरोध करीत आहोत. यासाठी कंपनीच्या एका अधिकाऱ्याची हत्या केली, वाहनांची जाळपोळ केली. पण शासनाने ठिकठिकाणी पोलीस केंद्र उभारून बळजबरीने खाणीचे काम सुरू केले. आता खाणीचा विस्तार करण्यात येणार आहे. हा सर्व प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. खाणीचे काम तत्काळ बंद न केल्यास परिणाम भोगण्यास तयार रहा, अशी धमकी माओवाद्यांनी या पत्रकातून दिली आहे. सरकारच्या  विस्तारित प्रकल्पासाठी तब्बल 1000 एकर जमीन खाणीसाठी दिली जात आहे. जरी सरकारचा दावा आहे की,ही सर्व जमीन वन क्षेत्रातील आहे. मात्र त्याच वनक्षेत्रावर अवलंबित 40 पेक्षा जास्त गाव या विस्तारित प्रकल्पातील प्रदूषणामुळे प्रभावित होणार आहे. 
सुरजागड खाणीमुळे शेतकऱ्यांचे पीक खराब होत असून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शिवाय खाणीतून निघणाऱ्या ट्रक्समुळे अनेक रस्ते अपघात होऊन अनेकांचा जीव जात आहे. त्यामुळे या विरोधात जन संघर्ष उभारण्याची गरज असून त्यात सर्व बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ता, वकील, स्थानिक जनता यांनी समोर येऊन आंदोलन उभा करावा असा आवाहन माओवाद्यांनी प्रेस रिलीजच्या माध्यमातून केला आहे. 
सूरजागड लोहखाणीचे काम सुरू करण्यामागे स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची मुख्य भूमिका असल्याचा आरोप करीत माओवाद्यांनी पत्रकात त्यांच्याविरोधातही आगपाखड केली आहे. स्थानिकांचा विरोध असतानाही आमदार आणि त्यांचे सहकारी खाणीच्या समर्थनात होते. त्यांनी हे सर्व कामे बंद न केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी माओवाद्यांनी दिली आहे. 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares