घशात सूज आणि खवखव जाणवत असल्यास, 'हे' प्रभावी घरगुती उपाय करा – ABP Majha

Written by

By: एबीपी माझा वेब टीम | Updated at : 01 Jun 2022 08:23 PM (IST)
Edited By: प्रिया मोहिते
Health Tips
Health Tips : अचानक कडक उष्णतेनंतर हवामान झपाट्याने बदलते आणि नंतर कधी कधी वादळ आणि पाऊस पडतो. त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. कडक उन्हाळ्यात थंड पाणी पिणे आणि पावसात आईस्क्रीम खाल्ल्याने घशात सूज आणि दुखणे होते. काही लोकांसाठी हा त्रास इतका वाढतो की त्यामुळे तापही येतो. सर्दी-खोकला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्वाधिक असतो, त्याचा परिणाम घशावर होतो. कधीकधी घशात ऍलर्जी देखील होते, ज्यामुळे खाण्या-पिण्यात त्रास होतो. तुम्हालाही अशी समस्या जास्त असेल तर नेहमी औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपायांचा अवलंब करा. यामुळे घसा खवखवणे आणि संसर्गापासून आराम मिळेल.
घसा खवखवणे घरगुती उपाय
1. मिठाच्या पाण्याने गुरळ्या करा : घसा दुखणे, सूज येणे किंवा दुखणे दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुरळ्या कराव्या. यामुळे घशाला खूप आराम मिळतो. गुरळ्यांसाठी पाणी थोडे कोमट असावे. 
2. कोमट पाण्याने सूज दूर होईल : घशात सूज असेल तर कोमट पाणी प्यावे. थंड पाण्याने ही समस्या वाढू शकते. कोमट पाणी प्यायल्याने संसर्ग हळूहळू कमी होतो. तुम्हाला हवे असल्यास पाण्यात थोडी हळदही टाकू शकता. त्यामुळे सूज कमी होईल.

News Reels
3. मधामुळे मिळेल आराम : घसा खवखवणे किंवा कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असल्यास मधाचे सेवन करावे. मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखी, खोकला आणि सर्दीपासून आराम देतात. मधामुळे घसा खवखवणे आणि सूज यांमध्येही आराम मिळतो.
4. हळदीचे दूध प्या : घसा खवखवणे आणि दुखत असल्यास रात्री हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक घटक असतात जे जळजळ आणि वेदना कमी करतात. हळद घशासाठी फायदेशीर आहे.
5. आले खावे : घसादुखी किंवा सर्दी खोकला झाल्यास आल्याचा वापर करा. आल्यामध्ये शक्तिशाली औषधी गुणधर्म असतात. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा तुकडा किसून एक ग्लास पाण्यात टाकून उकळा. 5 मिनिटे उकळल्यानंतर ते पाणी गाळून कोमट प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
धक्कादायक वास्तव! औरंगाबाद जिल्ह्यातील साडेसात हजारांवर बालके कुपोषणाच्या फेऱ्यात
Measles Disease: औरंगाबादमध्ये गोवरचा उद्रेक, गेल्या 19 दिवसांत तब्बल 237 संशयीत रुग्ण
FIFA World Cup 2022 : ‘या’ ड्रिंकमुळे अर्जेंटीना बनला विश्वविजेता? मेस्सीसह इतर खेळाडूंचीही पसंती; 5 क्विंटलचा साठा घेऊन संघ कतारला
Home Remedies For Acidity: सतत अॅसिडिटी होते? ट्राय करा हे घरगुती उपाय
Aurangabad: औरंगाबादमध्ये गोवरच्या आणखी 14 संशयित रुग्णांची भर, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले
Delhi Kisan Garjana Rally: दिल्लीच्या रामलीला मैदानात जमले 50 हजार शेतकरी, केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरच्या रस्त्यांवर गॅंगवॉर? अवैध दारूच्या वादातून दोघांची हत्या
‘Sorry दादा’! भर चौकात बॅनर लावून शिवसेनेच्या नगरसेवकाचा माफीनामा, माजी आमदारांची मागितली जाहीर माफी
YouTube क्रिएटर्समुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती, भारताच्या जीडीपीत दहा हजार कोटींचे योगदान
सावधान! एखाद्या मुलीला ‘छम्मक-छल्लो, आयटम म्हणालात तर तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो 

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares