Kolhapur News : दालमिया शुगरकडून पहिल्या उचलमध्ये 25 रुपयांची वाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून – ABP Majha

Written by

By: परशराम पाटील, एबीपी माझा | Updated at : 28 Oct 2022 12:03 PM (IST)

Kolhapur News
Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याची पहिली उचल नाकारत आंदोलन तीव्र करत ऊस वाहतूक रोखली होती. त्यानंतर संघटना कारखाना प्रशासनात झालेल्या चर्चेनंतर पहिल्या उचलमध्ये 25 रुपयांची वाढ निर्णय घेतला. त्यामुळे स्वाभिमानीने आंदोलन मागे घेतले आहे. 
दालमिया शुगरकडून पहिली उचल 3075 रुपये जाहीर केल्यानंतर स्वाभिमानीकडून कारखान्याची ऊस वाहतूक रोखण्यात आली होती. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखाना गेटसमोर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया साखर कारखान्याची (dalmia karkhana) ऊस वाहतूक रोखली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिली उचल कमी असल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासन आणि संघटना पदाधिकाऱ्यांची झालेली पहिली चर्चाही फिस्कटली होती. जोपर्यंत 3 हजार 75 पेक्षा जास्त पहिली उचल जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखान्याच धुरांड पेटवू देणार नाही, असा इशाराच स्वाभिमानीने दिला होता. मात्र, आता दुसऱ्या फेरीत चर्चेतून तोडगा निघाल्याने  कारखान्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
पंचगंगा साखर कारखान्याकडून (panchganga karkhana) एफआरपी 3 हजार 50 एफआरपी जाहीर करण्यात आल्याचे समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. कारखान्याची तोडणी, वाहतूक वजा करून 3 हजार 106 रुपये एफआरपी होत असताना 56 रुपये कमी एफआरपी जाहीर केल्याचे स्वाभिमानीने म्हटले आहे. त्यामुळे ही एफआरपी मान्य नसल्याचे स्वाभिमानीने म्हटले आहे. 3106 रुपये एफआपी जाहीर होत नाही तोपर्यंत गळीत हंगाम सुरु करणार नसल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पंचगंगा साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली होती. 

News Reels
तापर्यंत शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त शुगर, घोडावत जॅगरी तसेच शिरगुप्पे शुगर कारखान्याची ऊस वाहतूक आतापर्यंत स्वाभिमानीने रोखली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीसाठी कारखानदार आणि स्वाभिमानीमध्ये संघर्ष अटळ दिसू लागला आहे. 
इतर महत्वाच्या बातम्या 
 
 
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळून लावा – राज्य सरकार
छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार? महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी सरकारचं मोठं पाऊल  
Maharashtra News Updates 19 December 2022 :  आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीला होणाऱ्या विरोधाची महिला आयोगाकडून दखल, अभ्यासानंतर सरकारला अहवाल देणार
Pune Accident news : पुण्यात अपघाताचं सत्र थांबेना; दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू
शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाला काही कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
France Football Team : विश्वचषकाची फायनल गमावल्यावर फ्रान्स फुटबॉल संघाला आणखी एक धक्का, स्टार खेळाडूनं जाहीर केली निवृत्ती
IPL 2023 Auction : आगामी आयपीएल ऑक्शनपूर्वी कसा आहे केकेआरचा संघ? लिलावात ‘या’ खेळाडूंवर असणार नजर
सरोज अहिरेंच्या बाळाचं नाव आहे खास, अडीच महिन्याचा चिमुकला आईसोबत विधानभवनात!
विप्रो कंपनी मसालेही विकणार, मोठ्या कराराने पॅकेज्ड फूड आणि स्पाईस सेगमेंटमध्ये प्रवेश जाहीर
Koregaun Bhima: कोरेगाव भीमा येथे 31डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत मद्यविक्रीस बंदी, शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares