दिल्लीत शेतकऱ्यांची गर्जना रॅली; काय केल्या प्रमुख मागण्या ? – Hello Krushi

Written by

हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्लीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन पाहायला मिळाले, भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली शेतकरी सोमवारपासून म्हणजेच १९ डिसेंबरपासून दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘गर्जना रॅली’ काढण्यात आली. त्यासाठी देशातील विविध राज्यातील लाखो शेतकरी दिल्लीत जमा झाले
शेतकरी मेळाव्याला येणाऱ्या गर्दीमुळे दिल्लीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीशी संबंधित अॅडव्हायजरी जारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय किसान संघ पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबतही मोठी मागणी करण्याच्या तयारीत आहे. बीकेएस पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत 2000 रुपयांनी वाढ करण्याची मागणी करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. वास्तविक, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पाठवली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते पाठवण्यात आले आहेत.
त्याचवेळी बीकेएसचे कार्यकारी समिती सदस्य नाना आखरे म्हणाले की, शेतकरी धान्य, भाजीपाला, फळे आणि दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतात, मात्र त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. यामुळे अनेक शेतकरी हताश होऊन आत्महत्याही करत आहेत. त्यामुळे बीकेएस सर्व शेतमालाच्या रास्त भावासाठी सरकारकडे हमीभावाची मागणी करणार आहे. यासोबतच शेतीमालावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) न लावण्याची मागणी करणार आहे. शिवाय, बीएसके नेत्याने सरकारला जीएम (जेनेटिकली मॉडिफाईड) मोहरीला मान्यता देऊ नये असे सांगितले.
— भारतीय शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या
–खर्चावर आधारित पिकांना योग्य भाव द्यावा
–कृषी निविष्ठांवरील जीएसटी रद्द करण्यात यावा
–पीएम किसान योजनेतून मिळणारी रक्कम वाढवली पाहिजे
–जीएम पिकांवर बंदी घालावी
–सिंचनाचे पाणी प्रत्येक शेतापर्यंत पोहोचण्याची मागणी
© 2022.
© 2022.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares