काजू कतलीसाठी पुण्यात स्वीटमार्टच्या मालकावर फायरिंगचा प्रयत्न – Lokshahi

Written by

चंद्रशेखर भांगे | पुणे : शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच असून पुण्यातील सिंहगड रस्त्यावर धक्कादायक घटना घडली आहे. येथील फुलपरी स्वीट मार्टमध्ये घुसून बंदूकधाऱ्यांनी फुकट काजू कतलीसाठी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरज ब्रह्मदेव मुंडे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुण्यातील सिंहगड रस्ता असलेल्या जोधाराम चौधरी यांच्या फुलपरी स्वीट मार्टमध्ये सुरज ब्रह्मदेव मुंडे आणि त्याचा अल्पवयीन साथीदाराने घुसून एक किलो काजू कतली फुकट मागितली. परंतु, फुकट काजू कतली देण्यास चौधरी यांनी नकार दिल्यानंतर चिडलेल्या सुरज आणि त्याच्या साथीदाराने त्यांच्या जवळील पिस्टल काढत चार वेळा त्यांच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही आरोपींनी त्या ठिकाणाहून पळ काढाला.
दरम्यान, पुणे शहरात सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून शहरातील उपनगरामध्ये गुन्हेगारांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असताना पुन्हा एकदा गुंडांनी आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला आहे.
Lokshahi Marathi Ⓒcopyright2022

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares