चारबन येथे रानभाजी महोत्सव थाटात – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
बुधवार २१ डिसेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 08:50 PM2021-08-10T20:50:23+5:302021-08-10T20:50:30+5:30
– नानासाहेब कांडलकर
जळगाव जामोद : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जळगाव जामोद तालुक्यातील चारबन येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस.राममूर्ती तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईक  यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास उपविभाग जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,तहसीलदार सूर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव दीपक पटेल,तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे,कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद वैज्ञानिक विकास जाधव साहेब उपस्थित होते.जळगाव जामोद पंचायत समितीचे सभापती रामेश्वर राऊत हे सुद्धा उपस्थित होते.कृषी उपसंचालक विजय बेतीवार व कृषी विकास अधिकारी महाबळे यांची उपस्थिती होती.
      प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करून आदिवासी मुलींसोबत आदिवासी लोकनृत्य केले. जिल्हाधिकारी साहेबांचा वाढदिवस त्यांनी आदिवासी मुलांसोबत साजरा केलानंतर ते कृषि विभागामार्फत आयोजीत जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव चारबन तिथे येऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.रानभाजी महोत्सवास विविध 18 प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.तेथे त्यांनी सर्व भाज्यांची ओळख करून घेतली.तसेच आदिवासी महिलांनी बनविलेले 23 प्रकारच्या रेसिपी पाककृतिची पाहणी केली. 
कृषि विभागामार्फत आयोजीत रानभाज्या पाक कृती स्पर्धा घेण्यात आली होती.त्यात 14 आदिवासी महिलानी सहभाग घेतला.त्याची पाहणी सुद्धा साहेबांनी केली नंतर सर्व पाहुण्यांचे सत्कार समारंभ घेण्यात आला.अध्यक्ष म्हणून कार्यक्रमास सुलभा रवींद्र वाघमारे सरपंच ग्रामपंचायत उमापुर म्हणून लाभल्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस राममूर्ति लाभले होते तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्री  नरेंद्र नाईक,उपविभागीय अधिकारी देवकर, तहसीलदार सूर्यवंशी,कृषी विज्ञान केंद्र वरिष्ठ वैज्ञानिक जाधव साहेब उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनी साठे कृषी सेवक  यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत माननीय नाईक यांनी केले. कृषी विज्ञान केंद्राचे उमाळे सर यांनी रानभाज्यांचे महत्त्व समजून सांगितले.रानभाज्यांचे आदिवासी भगिनींनी बनवून आणलेल्या रेसिपीचे स्पर्धा घेण्यात आली.त्या स्पर्धेचे निवड झालेल्या प्रथम तीन आदिवासी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 
               आदिवासी महिलांनी आदिवासी गीतांचे सादरीकरण केले.कार्यक्रमाची प्रस्तावना नाईक यांनी केली व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप निमकर्डे मंडळ कृषी अधिकारी यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक,समुय सहाय्यक व आदिवासी बांधव उपस्थित होते.यानंतर माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत गारपेठ येथील भंगी सावकऱ्या ससत्या गट नंबर 11 यांच्या शेतातील मग्रारोहयो सन्त्रा फळबाग लागवडची पाहणी केली.तेथें फरोमोन ट्रप पाहणी केली. कपाशीवरिल किड रोगविषयी त्यानी जाणुन घेतले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत उमापूर येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ग्रामपंचायत उमापूर येथे भेट दिली व समितीच्या सदस्य सोबत चर्चा केली तसेच जमीन आरोग्य पत्रिकाचे फलक बाबत माहिती घेतली.
            यानंतर  जिल्हाधिकारी व उपस्थित सर्व कर्मचारी यांनी कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांनी ड्रोन  द्वारे फवारणी  करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.त्यानंतर अधिकारी यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत महात्मा फुले स्वयंसहायता जैविक शेती गट पाच भेट दिली गटाचे अध्यक्ष गजानन कोथळकर यांनी त्यांनी केलेल्या सर्व जैविक घटकांचे माहिती सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना दिली तिथेच सेंद्रिय गटांच्या विविध निविष्ठांची पाहणी माननीय जिल्हाधिकारी यांनी केली व त्याबाबत माहिती घेतली.यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टरची पाहणी सुद्धा करण्यात आली.
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares