'मविआ'तून बाहेर पडलेल्या 'स्वाभिमानी'ला ठाकरे गटाचा पाठिंबा; शेट्टींच्या … – News18 लोकमत

Written by

भुवया उंचावल्या! राज ठाकरेंची 'सावली' एकनाथ शिंदेंसोबत एकाच व्यासपीठावर
मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता, अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर आदित्य म्हणाले…
'स्वत:च्या घरात निष्ठा नसलेल्यांनी…', आदित्य ठाकरेंचा शेवाळेंवर पलटवार
एकनाथ शिंदेंचा आणखी एक सर्जिकल स्ट्राईक, संजय राऊतांचा जामीनदारच फोडला!
अहमदनगर, 21 डिसेंबर :  अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. आपल्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. ठाकरे गटाने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी मुळा धरणाच्या गेटवर पोहोचले आहेत. मात्र या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून, पोलिसांनी आंदोलकांना गेटवरच आडवले आहे. पोलिसांनी आंदोलकांना गेटवर आडवल्यानं आंदोलनस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पहायला मिळतंय. आंदोनस्थळी पोलीस,  रेस्क्यूरीटीम , फायर फायटरचे जवान आणी आरोग्य पथकही तैनात करण्यात आले आहे.
हेही वाचा :  सुषमा अंधारेंविरोधात वारकरी आक्रमक; उद्धव ठाकरेंनी भेट नाकारल्यानं मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
ठाकरे गटाचा पाठिंबा  
दरम्यान या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाने देखील पाठिंबा दिल्यानं हे आंदोलन चर्चेचा विषय बनलं आहे. शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्यावरूनच राजू शेट्टी हे ठाकरे सरकामधून बाहेर पडले होते. मात्र आता शिवसेना ठाकरे गटानेच या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं या आंदोलनाची चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Eknath Shinde, Farmer, Raju shetty, Uddhav Thackeray

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares