मासिक पाळीच्या काळात काही महिलांना डोळ्यांत रक्तस्राव का होतो? – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
‘रक्ताचे अश्रू’ अशी उपमा आपण लिहितो, बोलतो. पण एखाद्याच्या बाबतीत प्रत्यक्षात अशी वेळ आली तर? चंदीगडमधली एक मुलगी जेव्हा अशी समस्या घेऊन आली, तेव्हा तिचे पालक आणि कुटुंबीयच नाही, तर डॉक्टरही हैराण झाले होते. डोळ्यांतून रक्तस्राव होणं ही खरंच अतिशय दुर्मिळ गोष्ट होती. त्या मुलीच्या बाबतीत बोलायचं तर ती जेव्हा डॉक्टरांकडे आली तेव्हा तिची मासिक पाळी सुरू होती. या प्रकाराला ‘Vicarious Menstruation’ (पाळीदरम्यान योनीखेरीज इतर अवयवांमधून रक्तस्राव होणं) म्हणतात.
  हे नेमकं का होतं? त्यामागची कारणं काय? अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर हे एन्डोमेट्रिओसिस (endometriosis) या त्रासामुळे होतं.
फोटो स्रोत, Getty Images
गर्भाशयाच्या आत एक अस्तर असतं. त्याला एन्डोमेट्रियम (endometrium) म्हणतात. या अस्तरामध्ये विशिष्ट प्रकारच्या ऊती (tissue) आणि ग्रंथी असतात. त्या फिमेल हार्मोन्सना प्रतिसाद देतात.
मासिक पाळीच्या काळात गर्भाशयाचं हे अस्तरच रक्तस्त्रावाच्या रुपाने योनीमार्गातून बाहेर पडतं. त्यानंतर पुन्हा नव्याने एन्डोमेट्रियम तयार होते.
काही स्त्रियांच्या बाबतीत या विशिष्ट प्रकारच्या ऊती आणि ग्रंथी गर्भाशयाच्या बाहेरही आढळतात. तिथेही ते फिमेल हार्मोन्सना प्रतिसाद देतात. गर्भाशयाबाहेर समांतरपणे त्या कार्यरत असतात.

मासिक पाळीच्या काळात या ऊती आणि ग्रंथीही कार्यरत होतात.

लेखाच्या सुरूवातीला चंदीगडमधल्या ज्या मुलीचा उल्लेख आहे, तिच्या डोळ्यांमध्ये हे टिश्यू वाढले होते. त्याचाच परिणाम म्हणून पाळीच्या काळात तिच्या डोळ्यांत रक्तस्त्राव होत होता.
फोटो स्रोत, Getty Images
मासिक पाळीच्या काळात तीव्र वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
गर्भाशयाला फॅलोपियन ट्यूब जोडलेल्या असतात. या ट्यूबच्या टोकाला स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिलन होत असतं. पण एन्डोमेट्रिओसिसमुळे या ट्यूबची ग्रहण क्षमता कमी होते.
दुसरं म्हणजे एन्डोमेट्रिओसिसमुळे बीजकोश स्त्री बीजाची निर्मिती करण्यात असमर्थ ठरतात.
लक्षणांवरून एन्डोमेट्रिओसिसचं निदान करता येतं. प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर तुमच्या शारीरिक परिस्थितीचा अंदाज डॉक्टरांना येतो.
सखोल तपासणीसाठी लॅप्रोस्कोपी करावी लागते. दुर्बिणीच्या सहाय्याने तपासणी केल्यानंतर एन्डोमेट्रिओसिस नेमका कुठे आहे, तो किती पसरला आहे हे लक्षात येतं. वंध्यत्वाची कारणंही लॅप्रोस्कोपीतूनच अधिक स्पष्ट होतात.
त्यावरूनच उपचाराची पुढील दिशाही स्पष्ट होते.
फोटो स्रोत, Getty Images
ओटीपोटात होणाऱ्या तीव्र वेदनेमुळे संभोगही वेदनादायी होतो. यांमुळे शारीरिक संबंध ठेवतानाचा अवघडलेपणा येतो.
आता शारीरिक बाबींचा विचार करायचा झाल्यास एन्डोमेट्रिओसिसमुळे फॅलोपियन ट्यूबची रचना बदलते. त्यामुळे स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिलन सहजपणे होत नाही.
त्याशिवाय एन्डोमेट्रिओसिसमुळे बीजकोशातील पेशींचीही हानी होते. त्यामुळे स्त्रीबीजांची निर्मिती होत नाही.
गर्भाशयातील वातावरणही शुक्राणू आणि स्त्रीबीजाच्या मिलनासाठी पूरक राहात नाही. त्यातूनही हे मिलन होऊन भ्रूण तयार झाले तरी अडचणी येतात.

भ्रूणाच्या वाढीसाठी गर्भाशयाचं अस्तर हे सशक्त असायला हवं. पण एन्डोमेट्रिओसिसमुळे नेमकं हे अस्तरच नीट तयार होत नाही.
फोटो स्रोत, Getty Images
काही औषधोपचारांद्वारे स्त्रीबीज तयार होऊन ते फॅलोपियन ट्यूबमध्ये जाण्याची प्रक्रिया (ovulation) कार्यान्वित करता येऊ शकते.
IUI आणि आयव्हीएफसारख्या उपचारपद्धतींद्वारेही गर्भधारणा केली जाते.
एन्डोमेट्रिओसिसमुळे अनेकदा फॅलोपियन ट्यूब बंद असतात. लॅप्रोस्कोपीद्वारे त्या खुल्या केल्या जातात. त्यामुळे गर्भधारणेची शक्यताही वाढते.
फोटो स्रोत, Getty Images
एन्डोमेट्रिओसिसमुळे होणाऱ्या वेदना जर सौम्य किंवा मध्यम स्वरूपाच्या असतील, तर पेन किलर किंवा तत्सम औषधांनी त्या कमी केल्या जातात.
पण वेदना तीव्र असतील तर मात्र हार्मोनल ट्रीटमेंट्स केल्या जातात. त्यासाठी वेगवेगळ्या उपचारपद्धती उपलब्ध आहेत.
एन्डोमेट्रिओसिस जास्त पसरला असेल तर हिस्टेक्टोमी करावी लागते.
हा प्रकार मुख्यत्वे सिझेरियन पद्धतीने बाळंतपणामध्ये दिसून येतो.
सी-सेक्शनमध्ये गर्भाशयातील ऊती ओटीपोटाच्या इथे चिकटतात. जखम भरून आली तरीही हे टिश्यू फिमेल हार्मोन्सना प्रतिसाद देत जातात.
त्यामुळे सी सेक्शननंतर मासिक पाळीच्या काळात होणारी वेदना अनेकदा तीव्र असते.
कधीकधी या वेदनादायी टिश्यू काढून टाकण्यासाठी छोटी सर्जरीही करावी लागते.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares