मोकाट जनावरांसाठी काऊ हॉस्टेल – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
कासा, ता. २० (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायत बहुउद्देशीय केंद्र येथे एकात्मिक उपजीविका विकास प्रकल्पातर्फे काऊ हॉस्टेल (मोकाट गुरांचे वसतिगृह) संदर्भात मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. गंजाड ग्रामपंचायतीचे सरपंच व एकात्मिक उपजीविका प्रकल्प यांच्या सहकार्याने हा प्रकल्प गंजाड व रानशेत ग्रामपंचायतीमध्ये राबवला जाणार आहे.
सध्या या भागात अनेक शेतकरी, मजूर कामानिमित्त स्तलांतर करीत असतात. त्या मुळे आपली जनावरे मोकाट सोडतात. त्याचा त्रास अन्य शेतकरी व बागायतदार तसेच रस्त्यावर चालणाऱ्या वाहनचालकांना होत असतो. पूर्वी खेडोपाडी मोकाट गुरांसाठी कोंडवाडे असायचे; पण अनेक वर्षांपासून ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मोकाट गुरांची समस्या सर्वदूर निर्माण झाली होती; पण त्यावर उपाययोजना होत नव्हती. या वेळी गंजाड ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजित देसक, एकात्मिक उपजीविका कृषी प्रकल्पाचे अधिकारी चंद्रकांत पाटील, उपसरपंच कौशल कामडी सदस्य कैलास दळवी, विलास वरखंडे, काशी वायेडा, मनीषा कोदे, कृषी विकास प्रकल्पाचे विनोद कुटे पाटील व शेतकरी उपस्थित होते.
……………………..
शेडनिर्मितीबरोबरच आर्थिक उत्पन्नाचे साधन
एकात्मिक उपजीविका विकास प्रकल्पातर्फे लोकसहभागातून ही योजना राबवण्यात येणार आहे. मोकाट गुरे, दुभती जनावरे यांच्यासाठी शेडचे निर्माण करणे, त्यांची काळजी घेणे. हे करताना या गुरापासून मिळणारे शेण, गोमूत्र यांच्यावर प्रक्रिया करून आर्थिक उत्पन्न मिळविणे यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. याचबरोबर शेतीपूरक अन्य व्यवसायाचेदेखील मार्गदर्शन करण्यात आले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares