चंद्रशेखर भांगे | पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र टीकेचे धनी होणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्रात वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहेत. उदयनराजे यांनी राजीनामाची मागणी करून सुद्धा सरकार त्याची दखल घेत नाही. यामुळे पुण्यातील तीन तरुणांनी आता महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी राज्यपालांना हटवा या मागणीसाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करत आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.
छत्रपती हे मनात असले पाहिजेत, अशी इच्छा या तरुणांनी व्यक्त केलेली आहे. भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समोर ठेवून हे तीन तरुण अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाचा तिसरा दिवस असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आम्ही अन्नत्याग केला आहे. जोपर्यंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी होत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचं या तीन तरुणांनी सांगितला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर राज्यपालांविरोधात पुणे बंद करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीने महामोर्चा सुद्धा काढला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी सुद्धा राज्यपालांविरोधात वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आणि राज्यपालांना हटवावं, अशी मागणी केली. परंतु, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून यावर कुठलीच कारवाई होत नाही, असं वाटत आहे. त्यामुळे आम्ही आता आंदोलनाला बसलो आहे, असे या तरुणाने सांगितले आहे. उदयनराजे भोसले हे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याच आधारस्तंभाखाली आम्ही आंदोलन करत आहोत. असेही या तरुणाने यावेळी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले उदयनराजे यांचा भव्य कटआउट सुद्धा या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे लावण्यात आलेला आहे. तसेच, त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा करून ठेवलेला आहे. जेणेकरून त्यातून आम्हाला प्रेरणा भेटत आहे हे सगळं बंद झालं पाहिजे. राजकारण बंद करून त्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी या तरुणांची आहे.
Lokshahi Marathi Ⓒcopyright2022

Article Tags:
news