वसिम अत्तर | सोलापुर : मुलांना मुलगी मिळत नाहीये, लग्नाचं वय होऊनही लग्न जमत नाही. असे किमान पन्नासेक मुलं प्रत्येक गावात सर्रास पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावात मुलगी मिळत नसल्याची ओरड सुरु आहे. अशातच अविवाहीत मुलांनी आज चक्क नवरदेवाच्या वेशात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. या अनोख्या मोर्चाची चर्चा सर्वत्रच होताना पाहायला मिळत आहे.
लग्नाला मुलगी मिळण्यासोबतच गर्भलिंग निदान कायदा कडक करावा. गर्भलिंग निदान कायद्याची अंमलबजावणी नीट होत नसल्याने लोक सर्रास गर्भलिंग निदान करून मुलींना गर्भातच मारून टाकत आहेत. त्यामुळेच मुलांना लग्नाला मुली मिळत नाही. त्यामुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. याची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन गर्भलिंग निदान कायदा कडक करावा. तसेच, तरुण मुलांना मुली मिळाव्या या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट मोर्चा काढला. या मोर्चाचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे.
Lokshahi Marathi Ⓒcopyright2022

Article Tags:
news