विजयाचा गुलाल बेतला जीवावर! सांगलीमध्ये मोठी दुर्घटना – Lokshahi

Written by

संजय देसाई | सांगली : राज्यभरात मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयी गुलाल उधळला गेला. परंतु, याच गुलालामुळे सांगली जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. सरपंच पदी भाजप नेता निवडून आल्यानंतर महिलांनी ओवाळताना चुकून कार्यकर्त्यांनी अंगावर गुलाल टाकला. या गुलालाचा अग्नीशी संपर्क आल्याने भडका उडाला. यामध्ये नूतन सरपंचासहित दोन जण जखमी झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील खटाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे रावसाहेब बेडगे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडून आले. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांची एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. विजयी रावसाहेब बेडगे यांचे महिला औक्षवण करत होत्या. याचवेळी कार्यकर्त्यांनी चुकून गुलाल अंगावर टाकला. अग्नी व गुलाल यांचा संपर्क आल्याने मोठा भडका उडाला. या भडक्यात नूतन सरपंच रावसाहेब बेडगे यांच्यासह सुरेश परीट, अजित खटावकर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरजेच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रथम क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून तिसऱ्या क्रमांकावर स्थानिक आघाडी असून चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या शिंदे गटाने उल्लेखनीय कामगिरी केली असून ठाकरे गट मात्र शेवटच्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे.
Lokshahi Marathi Ⓒcopyright2022

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares