समस्या पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सोमाटणे, ता. १८ ः शेतीमालाच्या वाहतुकीसाठी वरदान ठरणाऱ्या पाणंद रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी खडीकरण करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
पाणंद रस्ते शेत मालाची सुरक्षीत वाहतूक करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शेतकरी किंवा शासनाचे लक्ष नसते. सध्या पवनमावळातील सर्वच पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली असून यातील अनेक रस्ते पावसाळ्यात दळणवळणासाठी बंदच असतात किंवा त्यावर पाणी साठते, अशावेळी शेतकऱ्यांना मालाची वाहतूक करणे कठीण होते. त्यातच पवनमावळाच्या पूर्व भागात काळी कसदार जमिनी असल्याने पावसाळ्यात पाणंद रस्त्यांची दुरवस्था लवकर होते. या रस्त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचे एकमत होत नसल्याने पाणंद रस्त्याची दुरुस्ती रखडली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत जातात. ही समस्या सोडवण्यासाठी शासनाने तातडीने या पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करून त्याचे खडीकरण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
PNE22T12015
Smt१८Sf१.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares