''हापूस''वरील फळमाशी समस्या मोठी | Sakal – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
swt156.jpg
68634
देवगड : येथे आंबा व्यापारी अशोक हांडे यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्र : वैभव केळकर)
‘हापूस’वरील फळमाशीची समस्या मोठी
आंबा व्यापारी अशोक हांडे ः देवगड येथे शेतकरी कार्यक्रमात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १५ : हापूस आंब्यावरील फळमाशीची समस्या मोठी आहे. त्यावर बागायतदारांनी वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूस बहिष्कृत होण्याची भीती आहे. त्यामुळे बागायतदारांनी सर्व शक्तीनिशी त्यावर मात करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असे आवाहन वाशी फळबाजारातील आंबा व्यापारी अशोक हांडे यांनी येथे केले.
येथील शेतकरी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मंचावर माजी आमदार अजित गोगटे, विद्याधर जोशी, संदीप कुळकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी हांडे यांनी आंबा व्यवस्थापन आणि किडरोग नियंत्रण तसेच बाजारस्थिती या अनुषंगाने मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "आंबा व्यवसायावर तुडतुडे, थ्रीफ्टस, बुरशी, मिलीबग यांसह फळमाशी आदी संकटे उभी आहेत. त्यातील फळमाशी सद्यस्थितीत मोठे नुकसान करणारी आहे. त्यावर वेळीच उपाय योजना न केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापूस बहिष्कृत होण्याची भीती आहे. त्यामुळे बागायतदारांनी सर्व शक्तीनिशी त्यावर मात करण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत. फळमाशीवर उपाय करण्यासाठी सगळ्यांनी विचाराने आणि मनाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे." दरम्यान, फळमाशीवर मुंबईतील निर्यातदारांनी काय प्रयत्न केले, याची माहिती हांडे यांनी दिली. आंब्याचा दर आणि खर्च यातील तफावत कमी करण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करून खर्च जास्तीत जास्त कमी करण्याचे त्यांनी आवाहन केले. मेळाव्यात शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला विद्याधर जोशी यांनी, तर शेतकरी हिताच्या सरकारी योजनांविषयी माहिती अजित गोगटे यांनी केली. यावेळी हांडे यांच्याकडे आंबा पाठविणारे तालुक्यातील आंबा बागायतदार प्रमोद पाटणकर, शैलेश बोंडाळे, श्रीरंग भिडे, राहूल गोगटे यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते.
………………….
चौकट
शासनाकडून भरपाई शक्य
अतिशीघ्र नाशिवंत प्रकारात आंबा मोडत असल्याने त्यास हमीभाव मिळणे शक्य होत नाही; परंतु सरकार तशी हमी पातळी ठरवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकते, असेही अशोक हांडे यांनी सांगितले.
……………..
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares