15 दिवस, 121 राण्या… गणिताच्या मदतीने कसं व्हायचं सम्राटाच्या प्रणयाचं नियोजन? – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
एकाबाजूला पाश्चिमात्य देशांमधली प्राचीन सभ्यता संपुष्टात येत होती, त्याचवेळी दुसरीकडे पूर्वेकडचे देश नवनवी शिखरं पादक्रांत करत होते.
त्या काळात सागरी मार्ग शोधणं असो वा दिवसाचे किती वाजले हे ठरवणं असो…या सर्वांमध्ये गणिताची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे बऱ्याच प्राचीन संस्कृतींमध्ये गणिताचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढला होता.
या गणिताचा प्रवास इजिप्त, मेसोपोटेमिया आणि ग्रीस असा सुरू झाला होता. पण या संस्कृतींचा ऱ्हास झाल्यानंतर पश्चिमेतील त्याची प्रगती थांबली.
मात्र, पूर्वेकडील देशांनी गणितात चांगलीच प्रगती केली.
प्राचीन चीनमध्ये गणित हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता. याच गणिताचा आधार घेऊन हजारो मैल पसरलेली 'ग्रेट वॉल ऑफ चायना' उभारण्यात आली.
शाही कोर्टात खटले चालवताना अंक ही महत्वाची गोष्ट होती.
त्या काळात चीनचे सम्राट आपले बहुतांशी निर्णय कॅलेंडर आणि ग्रहांच्या हालचालींवर घ्यायचे. अगदी रात्रीचे कार्यक्रम असो वा दिवसाचे कार्यक्रम, कॅलेंडर हा विषय त्यांच्यासाठी महत्वाचा असायचा.
सम्राटाच्या जनानखान्यात असणाऱ्या स्त्रियांसोबत सम्राटाने रात्रीचा किती वेळ घालवावा यासाठी शाही मंत्री तैनात केले जायचे. हेच मंत्री सम्राटाच्या प्रणयाची वेळ ठरवायचे.
फोटो स्रोत, Getty Images
असं म्हटलं जायचं की, चीनच्या सम्राटाला 15 दिवसात 121 महिलांसोबत प्रणय करावा लागायचा. हे सगळं गणिताच्या भौमितिक क्रम किंवा भौमितिक मालिकेवर आधारित असायचं.
• महाराणी
• 3 वरिष्ठ बायका
• 9 बायका
• 27 हरमदासी
• 81 दासी
महाराणी पासून दासीपर्यंत स्त्रियांचे पाच गट असायचे. प्रत्येक पहिला गट त्याच्या आधीच्या गटापेक्षा तिपटीने मोठा असायचा. सम्राट या गटातल्या प्रत्येक एका स्त्रीसोबत प्रणयाराधना करेल यासाठी एक ठराविक कालावधी निश्चित करण्याचं काम गणितज्ञांचं असायचं. यासाठी त्यांनी एक रोस्टर तयार केलं होतं, जेणेकरून जनानखान्यातल्या प्रत्येक स्त्रीला प्रत्येक 15 दिवसानंतर सम्राटासोबत प्रणय क्रीडा करण्याची संधी मिळेल.
पहिली रात्र महाराणीसाठी असायची. दुसरी रात्र सम्राटाच्या वरिष्ठ बायकांसाठी आणि तिसरी रात्र नऊ बायकांसाठी असायची.
यानंतर सम्राट पुढची रात्र नऊ नऊ नऊच्या संख्येत हरमदासींसोबत घालवायचा. अशाप्रकारे सहा रात्री जायच्या.
यानंतर 81 दासींचा नंबर यायचा. यांच्यासाठी पण नऊच्या गटात विभागणी केली जायची. अशाप्रकारे सम्राट 15 रात्रीत 121 महिलांसोबत प्रणयाराधना करायचा.
फोटो स्रोत, Getty Images
चीनच्या पहिल्या येलो सम्राटाचं स्मारक
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
पौर्णिमेच्या दिवसांत सम्राटासोबत सर्वोच्च दर्जाची स्त्री असावी याचीही नोंद रोस्टरमध्ये केलेली असायची.
चीनच्या प्राचीन मान्यतांनुसार, या काळात स्त्रियांची 'यिन', म्हणजेच त्यांची प्रजनन क्षमता वाढलेली असते. याच दरम्यान स्त्रिया 'यांग' म्हणजेच पुरुषी शक्तीचा सामना करण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत असतात अशीही मान्यता होती.
सम्राट शासक असल्याने त्याच्यात शारीरिक क्षमता टिकवून ठेवणं गरजेचं होतं. तसंच सम्राटाचा उत्तराधिकारी मिळवण्यासाठीही त्याची शारीरिक क्षमता तितकीच गरजेची होती.
आता ही गणितीय आकडेमोड फक्त कोर्ट, प्रणय यापुरती मर्यादित नव्हती तर राज्य चालवण्यातही गणिताचा मोठा वाटा होता.
कठोर कायदे, विस्तृत कर प्रणाली, वजन आणि चलनाची प्रामाणिक व्यवस्था या गोष्टींमुळे प्राचीन चीनचं साम्राज्य वाढतंच होतं.
पश्चिमी देशांमध्ये दशांश प्रणाली येण्याच्या आधी किमान 1000 वर्ष आधी चीनमध्ये ही प्रणाली अस्तित्वात होती. एवढंच नाही तर, 19 व्या शतकात पाश्चिमात्य देशांत जी गणितीय समीकरणं मांडली गेली त्याचा वापर कित्येक शतकं आधी चीनमध्ये करण्यात आला होता.
एका पौराणिक कथेनुसार, चीनमध्ये देवता मानल्या जाणार्‍या येलो सम्राटाने इसवी सन पूर्व 2800 मध्ये गणिताची रचना केली होती.
अंकांमध्ये गूढ शक्ती असते असं आजही चीनमध्ये मानलं जातं.
फोटो स्रोत, Getty Images
चिनी अॅबॅकस
पुरुषांसाठी विषम संख्या आणि महिलांसाठी सम संख्या ठरवून देण्यात आलीय.
प्रत्येक जण 4 हा आकडा टाळताना दिसतो. तर 8 हा लकी नंबर आहे.
प्राचीन चीनमध्ये, अंक वापरून आकृत्या तयार केल्या जायच्या. सुडोकूची प्रारंभिक आवृत्ती देखील चीनमध्येच विकसित करण्यात आली होती.
चीनमध्ये 6 व्या शतकात गणितीय प्रमेयांचा वापर करून खगोलशास्त्रातील ग्रहांच्या गतीची गणना केली जायची.
इंटरनेटच्या क्रिप्टोग्राफीमध्ये आजही त्याचा वापर होताना दिसतो.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares