Akola : निसर्गाच्या लहरीपणानंतर खरिपातील पिकांना धोका कशाचा? काय … – TV9 Marathi

Written by

गणेश सोनोने | Edited By: राजेंद्र खराडे
Updated on: Jul 22, 2022 | 10:14 AM
अकोला :  (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय यंदाच्या (Kharif Season) खरीप हंगामात शेतकऱ्यांना आला आहे. सलगच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण आता पिकांची वाढ होणार कशी असा सवाल उपस्थित होत आहे. पावसामुळे पिके केवळ पाण्यात राहिले एवढेच नाहीतर भर पावसामध्ये (wild animals) वन्य प्राण्यांनीही पिकांवर ताव मारलेला आहे. आता पावसाच्या उघडीपनंतर शेतकऱ्यांनी पिकांची पाहणी केली त्या दरम्यान ही बाब समोर आली आहे. त्यामुळे संकटाची मालिका ही सुरुच आहे. दुबार पेरणी करुन खरिपाबाबत शंका उपस्थित होत असताना आता हे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सांगा शेती करावी कशी? असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.
शेतकऱ्यांचे पिक चांगली आहेत पण शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या पावसामुळे शेताचे राखण करता आले नाही. जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात सोयाबीन, कपाशी,उडीद,मुग इत्यादी प्रकारची पिके ही वाणी, हरीण आणी रानडुकरांनी फस्त केल्यामुळे पिके येण्यापूर्वीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता कुठे पावसाने उघडीप दिल्यानंतर मशागतीची कामे करता येतील म्हणून पीक पाहणी करीत असताना वेगळेच वास्तव समोर येत आहे. त्यामुळे जिल्हा व्यवस्थेने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेत शिवरात पाणी साचून राहिले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी नुकसानीच्या खुणा ह्या कायम आहेत. शिवाय पावसामुळे शेतामध्ये मार्गस्थही होता येत नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्तही करता आलेला नाही. पावसाची उघडीप आणि पोषक वातावरणामुळे पीक वाढ जोमात होत आहे. पण वन्य प्राण्यांचा बंदोबस्त झाला तरच पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे.

निसर्गाचा लहरीपणाबरोबरच पिकांना वन्यप्राण्यांचाही धोका वाढत आहे. खरीप आणि रब्बी हंगामातही या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यांना वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत. यामाध्यमातून वन्यप्राण्यांकडून जरी पिकाचे नुकसान झाले तरी त्याची भरपाई ही मिळणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही योजना 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती. आता येथून पुढे राज्य सरकारे वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान देखील विचारात घेऊ शकतात.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 1517
Channel No. 1259
Channel No. 682

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares