Maharashtra Assembly Winter Session Live Updates: विधान परिषदेत एनआयटी भूखंड प्रकरणात विरोधक आक्रमक; तर सत्ताध – ABP Majha

Written by

By : एबीपी माझा वेब टीम | Updated: 22 Dec 2022 07:26 AM (IST)
Maharashtra Assembly Winter Session: राज्यातील ग्रामपंचायत मध्ये ‘आपले सेवा केंद्र’ प्रकल्पातील संगणक परिचालकानी किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाची बुधवारी रात्री 10 वाजता सांगता झाली. दुपारी काढण्यात आलेला मोर्चा दुपारी 1 वाजताच मोर्चा पॉइंटवर पोहचला होता. मात्र, ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे तब्बल दहा तास ठाण मांडून होते. अखरे ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने पुढील 15 दिवसात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मोर्चा मागे घेतला. 
Maharashtra Assembly Winter Session: विधीमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून NIT जमीन विक्री प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विरोधक आजही आक्रमक राहण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तिसऱ्या दिवशी लावून धरली होती. विधान परिषदेत एनआयटीच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आज विधीमंडळात आज विरोधक आक्रमक राहण्याची शक्यता आहे. 
विधीमंडळात 54 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आता आज सभागृहात पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत.
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. कारण माझ्या मतदारसंघातील अनेक कामे स्थगित करण्यात आली. निधी रोखण्यात आला. आणि केवळ माझे राजकिय विरोधक यांच्या सांगण्यावरुन हे सगळं होतं आहे. परन्तु माझ्या एका कामाबाबत माझ्या राजकीय विरोधकांनी अनेक प्रयत्न करून देखील मुख्यमंत्री यांनी माझ्या फाईलवर सही करून मला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे, असे रोहीत पवार विधानसभेत म्हणाले.
अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे हा कार्यक्रम झाला. 
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. अॅपच्या निर्मितीसाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे विशेष सहाय्य करण्यात आले आहे. या अॅपचे आज लोकार्पण करण्यात  आले. सध्या प्रायोगिक तत्वावर गुगल प्ले स्टोअरवर अॅप उपलब्ध असून मंत्री, आमदार आणि सचिवांसाठी ते उपलब्ध होऊ शकेल. येणाऱ्या काळात या ॲपमध्ये अधिक सुधारणा आणि माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे.
Maharashtra Assembly Winter Session: एनआयटीच्या मुद्यावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले. शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब यांच्याकडून एनआयटी भूखंडा मुद्या मांडला जात असताना सत्ताधारी भाजपा आमदारांकडून हौद्यामध्ये उतरून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. वाढता गोंधळ पाहता कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 
Maharashtra Assembly Winter Session: विधान परिषदेत एनआयटी भूखंड प्रकरणात विरोधक आक्रमक झाले आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे
Maharashtra Assembly Winter Session: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा (PCMC) शासस्ती कर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेत शासस्ती कर वसूल होतं नाही असं लक्षात येतं नाही. मूळ कर देखील वसूल होतं नाही. महापालिकेचे मोठं नुकसान होतं आहे. मी मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा केली आहे. आम्ही शासस्ती कर रद्द करत आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. पिंपरी-चिंचवड मधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार असून त्याबाबतची योजना जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. 
चीनमध्ये कोरोनाच्या उद्रेकाचा मुद्दा  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. सरकारने याबाबत तातडीच्या उपाययोजना आखाव्यात अशी मागणी त्यांनी केली.  
Maharashtra Assembly Winter Session:  नागपूर न्यास प्रकरणावरून विधानसभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधान परिषदेत नागपूर न्यास प्रकरणं विषयावर सरकाराला बोलायला परवानगी देण्यात आली त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली आणि विधान सभेत मात्र, तुम्ही आम्हाला चर्चा करू देत नाही. तुम्ही म्हणता कोर्टात केस सुरू आहे. हे असं चालणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले. कोर्टातील विषयवार मंत्र्यांना बोलू देता आणि आम्हाला बोलू दिले जात नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. 
Maharashtra Assembly Winter Session: अस्थिव्यंग, गतिमंद , न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचार सुविधा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. 
Maharashtra Assembly Winter Session: नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. 
Maharashtra Assembly Winter Session: राज्यात लवकरच डॉक्टर, टेक्निशियनच्या साडे चार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे. 
Maharashtra Assembly Winter Session: राज्यात लवकरच डॉक्टर, टेक्निशियनच्या साडे चार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी केली. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे. 
 Maharashtra Assembly Winter Session:  नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणाच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधक आज विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) तिसऱ्या दिवशीही आक्रमक होण्याची शक्यता आहे. क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी
Maharashtra Assembly Winter Session:  बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला आहे. एनआयटी भूखंड प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. परंतु, त्यांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत दुपारी विरोधकांनी सभात्याग केलाय. 
Maharashtra Assembly Winter Session: कोणत्याही गैरमार्गाने NIT ला भूखंड दिला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत म्हटले. न्यासा भूखंड प्रकरणी विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरोप फेटाळून लावले. 
Maharashtra Assembly Winter Session: राज्यामध्ये आर्टिफिशयल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटीची स्थापना होणार, कर्जत परिसरात होणार विद्यापीठ
उच्च शिक्षणाचा विकास व अभिवृद्धी करण्यासाठी शासनाचे प्रयत्न
विद्यापीठाचे विधी संस्थापन विनिमय आणि संबंधित बाबींसाठी तरतूद करण्यासाठी आज विधान परिषदेत विधेयकम
Maharashtra Assembly Winter Session 2022: समृद्धी मार्गावरील गैरसोय आणि प्राण्यांच्या अपघाती मृत्यू मुद्दा विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. 
समृद्धी महामार्गावर टॉयलेट नाही. वाहनांच्या वेग मर्यादे बाबत वाहन चालकांना त्याची कल्पना नाही. मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. त्या दिवशी त्यांच्याकडे मर्सिडीज कार होती. गाड्यांचे हिवाळ्यात टायर फुटत आहेत. समृध्दी महामार्गावर अनेक जनावरांचा अपघाती मृत्यू होत आहे. कितीतरी कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. माकडेदेखील येतात. त्यांचाही अपघात होण्याची भीती आहे. रस्ते सुरक्षा संदर्भात सरकारची काय भूमिका आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
यावर राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, समृद्धी महामार्गावर या दोन ते तीन महिन्यांत खड्डे पडले नाहीत. गेली अडीच वर्षांपासून हे खड्डे पडलेले आहेत. त्याची ही चौकशी केली जाईल. समृद्धी महामार्गावर 150 किमी प्रति वेगाने वेगाने वाहने चालवू शकतो. पण, आपण 120 किमी प्रति वेग इतकी मर्यादा घातलेली असल्याचे त्यांनी म्हटले. 


Winter Assembly Session  Nagpur Update:  राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्य शास्त्र व लोकप्रशासन विषयांवर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 49 वे संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषद सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर विधानसभेसमोरील पायऱ्यांवर मुख्यमंत्री, उपकमुख्यमंत्री आदींसोबत विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटो काढण्यात आला.
Maharashtra Assembly Session 2022: विधान परिषदेत कामकाजाला सुरुवात झाली आहे. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू असून गोंधळ उडाला आहे. 
Maharashtra Assembly Winter Session: राष्ट्रीय गुन्हे नोंदी शाखा अहवालानुसार वर्ष 2021 मध्ये कृषी क्षेत्रात देशात एकूण 10 हजार 881 शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत.  त्यापैकी राज्यात 2649 शेतकरी आणि 1424 शेतमजूरांनी आत्महत्या केल्या आहेत. वर्ष 2021 मध्ये एकूण 4064 आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ कालावधीत राज्यात 2138 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये अमरावती 817, नागपूरमध्ये 260 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबादमध्ये 756 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्या एकूण 2138 प्रकरणांपैकी 1159 प्रकरणे जिल्हा समितीने मदतीसाठी पात्र ठरवली आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 
 
Live: महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण, पाहा…


विरोधी पक्षनेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कामाच्या स्थगितीवरून विधानसभेत खडाजंगी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर पलटवार केला. त्यांनी म्हटले की, अजित पवार उपमुख्यमंत्री असताना तुम्ही कामे रोखली होती. अडीच वर्षात भाजपच्या आमदारांना निधी मिळाला नाही. आम्ही सूडाचे राजकारण करत नाही. आम्ही विरोधकांवर अन्याय करणार नाही, आवश्यक ती कामे सुरू झाली आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले. 
Nagpur : महाविकास आघाडीची बैठक संपताच महाविकास आघाडीचे नेते राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत विधान भवन परिसरात पोहोचले. तेवढ्यातच भाजपच्या पक्ष कार्यालयातून भाजप आणि शिंदे गटाचे आमदार ‘भारत माता की जय’च्या च्या घोषणा देत विधान भवनाच्या पायऱ्यांवर पोहोचले. राज्य सरकार आणि विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये घोषणेची स्पर्धाच सुरु झाली…
Winter Session: विरोधकांविरोधात सत्ताधाऱ्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले आहे. संतांबाबत कथित अपमानास्पद वक्तव्ये आणि इतर मुद्यांवरून भाजप-शिंदे गटाच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. विरोधकांच्या आरोपांना सभागृहातही उत्तर देणार असल्याचे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 
Winter Session: गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी अशा घोषणा देत विरोधी पक्षाच्या आमदारांनी पायऱ्यांवर आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनात महाविकास आघाडीमधील अनेक आमदार यात सहभागी झाले आहेत.
Winter Session: श्रद्धा वालकर प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी लावण्यात आलेली आहे. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणासह आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती यावरदेखील विरोधक आक्रमक होणार असल्याचे संकेत आहेत.


Nagpur News Update : नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कामकाज सुरु होण्यापूर्वी, महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आणि विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत, विधीमंडळाच्या कामकाजासंदर्भात व्यूहरचना ठरवण्यात आली. तसेच सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, एकनाथराव खडसे, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, अनिल परब आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.
Winter Session: महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आणि आमदार पोहचले. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे बैठकीला पोहचणार
Winter Session: महाविकास आघाडीची आज सकाळी 9.30 वाजता विधान भवनात बैठक होणार आहे. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तिन्ही पक्षांची भूमिका कशी असावी या संदर्भात उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीत तिन्ही पक्षांची रणनीती ठरवली जाणार आहे. 
Nagpur News Update : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झाले आहे. यंदा प्रथमच विधान भवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिंबध घालण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री  चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक नंतर राज्यभरात हे प्रकरण गाजले होते. या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून विधानभवन परिसरात शाईच्या पेनवर बंदी घालण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून शाई पेनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.
Winter Assembly Session: विधानसभा आणि विधान परिषदेचे दिवसभरातील कामकाज स्थगित करण्यात आले आहे. 
Maharashtra Assembly Winter Session: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे बाळाला घेऊन अधिवेशनात, पाहा व्हिडिओ
 

CM Ekanth Shinde: सीमा प्रश्नाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारने पहिल्यांदात या प्रकरणात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र सरकारची भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे. याचे तुम्ही स्वागत करायला हवे असेही त्यांनी म्हटले. मागील अडीच वर्षात आधीच्या सरकारने निधी आणि योजना बंद केल्या होत्या त्या आम्ही सुरु केल्या असल्याचे त्यांनी म्हटले.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. 
Winter Assembly Session: शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार सुषमा अंधारेंच्या विरोधात आक्रमक पवित्र्यात आहेत. थोड्याच वेळात विधानभवनाच्या पाय-यांवर सर्व मंत्री आणि आमदार आंदोलन करणार आहेत. 
Winter Assembly Session: आजपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. सात मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली असून चार मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा…
Shiv Sena: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी शिवसेनेच्या कार्यालयाची विभागणी करण्यात आली आहे. दोन्हीही कार्यालये आजूबाजूला असणार. 
Maharashtra Assembly Winter Session:  नागपूर येथे सुरू झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर, विरोधकांच्या आरोपांना परतवून लावण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमानावरून आणि सीमा प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. लोकायुक्त कायद्याचं विधेयकदेखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. 
विधीमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून NIT जमीन विक्री प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विरोधक आजही आक्रमक राहण्याची शक्यता आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तिसऱ्या दिवशी लावून धरली होती. विधान परिषदेत एनआयटीच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आज विधीमंडळात आज विरोधक आक्रमक राहण्याची शक्यता आहे. 
विधीमंडळात 54 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आता आज सभागृहात पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत.
 
नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणाच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधक आज विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) तिसऱ्या दिवशीही आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी एनआयटी जमीन विक्री प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून निवदेन सादर होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती. आज तिसऱ्या दिवशीदेखील विरोधक सरकारला विविध मुद्यांवरून घेरण्याच्या तयारी असणार आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांच्या आक्रमणाला परतवून लावण्यास सत्ताधाऱ्यांकडून रणनीति ठरवण्यात आली आहे. 
हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही विरोधक सरकारच्या विरोधात अनेक मुद्द्यावरून आक्रमक होणार आहेत. सीमा वादाचा प्रश्न ,शेतकऱ्यांना न मिळालेली मदत या सर्व मुद्द्यांवरती विधानभवनाच्या पायऱ्यावरती विरोधक साडेदहा वाजता आंदोलन करतील आणि सभागृहातही आक्रमक राहणार आहेत. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तीनही पक्षांची भूमिका कशी असावी या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत तीनही पक्षांची स्ट्रॅटेजी ठरवली जाईल. श्रद्धा वालकर प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे श्रद्धा वालकर या विषयासह आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती यावरती विरोधक आक्रमक होणार आहेत.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान आदी मुद्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. 
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल.
सरकारकडून 23 विधेयके प्रस्तावित आहेत. तर 5 अध्यादेश देखील पटलावर ठेवण्यात येणार आहेत. 23 अध्यादेशांपैकी मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त 12 विधेयके आहेत. तर मंत्रिमंडळ मान्यता सापेक्ष 11 विधेयके आहेत. 
1. विधानसभा विधेयक –  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (तिसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या वाढविणेबाबत) (ग्रामविकास विभाग), 
2. विधानसभा विधेयक – महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) सुधारणा विधेयक, 2022 ( सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 11 चे रूपांतर) (शेतकऱ्यांना निवडणूकीत उभे राहता येण्याकरिता नियमात सुधारणा) (कृषी विभाग). 
3. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक. मुंबई महानगरपालिका (दुसरी सुधारणा) विधेयक, 2022 (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 12 चे रूपांतर) (इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत) (नगर विकास विभाग). 
4. विधानसभा विधेयक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (विद्यापीठ) आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 , (सन 2022 चा अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (विद्यापीठांचे कुलगूरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता तरतूद) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
5. विधानसभा विधेयक- . जे.एस.पी.एम. युनिव्हर्सिटी विधेयक, 2022 ( नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबत) (उच्च व तंत्रशिक्षण विभाग). 
6.  महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र सिनेमा ( विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2022 ( शिक्षेची तरतूद कमी करण्याबाबत) (गृह विभाग).
7. विधानसभा विधेयक – महाराष्ट्र औद्योगिक संबंध, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामे (नोकरीचे नियमन व कल्याण), महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र कागारांचा किमान घरभाडे भत्ता (सुधारणा) विधेयक, 2022 (मुख्य अधिनियमातील तुरंगवासाच्या तरतुदीऐवजी दंडाची तरतूद वाढविण्याकरिता) (उद्योग, ऊर्जा व कामगार).
8. विधानपरिषद विधेयक – युनिवर्सल ए. आय. विद्यापीठ, पुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग). 
9. विधानपरिषद विधेयक –  पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).
10. विधानसभा विधेयक – महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग).
11. विधानसभा विधेयक – उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधीन करणे(सुधारणा) विधेयक, 2022 (नगर विकास विभाग)
12. विधानसभा विधेयक – महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2022 (वित्त विभाग).
COVID-19 BF.7 Omicron Variant: भारतात ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट BF.7 ची एन्ट्री; कितपत धोकादायक अन् लक्षणं काय?
कोरोनाकाळात भारतात तब्बल 1 लाख 61 हजार नागरिकांची आत्महत्या, NCRB ची धक्कादायक आकडेवारी
Winter Solstice 2022 Today: आज Winter Solstice; वर्षातील सर्वात लहान दिवस अन् सर्वात मोठी रात्र
ST Bus: एसटी महामंडळ शेवटच्या घटका मोजतंय का? वाचा काय आहे नेमकी स्थिती….
Share Market Prediction: शेअर बाजारात ‘या’ शेअर्समध्ये आज दिसू शकते तेजी, होईल चांगला नफा!

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares