जागतिक AIDS दिन: HIV प्रसाराविषयी प्रचलित 8 गैरसमजुती – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक AIDS दिवस 1 डिसेंबरला असतो. ही लाल रंगाची फित या रोगाबाबतच्या जनगागृतीचं प्रतिनिधिक चिन्ह आहे.
HIVचा संसर्ग ही जागतिक पातळीवरची आरोग्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते या रोगामुळे आतापर्यंत 3.5 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
HIVची लागण हे AIDSचं सगळ्यात मोठं कारण आहे. या विषाणूची बाधा झालेले एकूण 3.7 कोटी लोक जगभरात आहे. त्यापैकी 70% लोक एकट्या आफ्रिका खंडात आहे.
2017मध्ये 18 लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. गेल्या वर्षी जगभरात 10 लाख लोकांचा HIVशी निगडित रोगांमुळे मृत्यू झाला आहे.
हा रोग 1980च्या दशकात पसरायला सुरुवात झाली. HIVची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका उद्भवतो का, या सगळ्या प्रश्नांवर अनेक माध्यमांद्वारे जनजागृती पसरत असली तरीसुद्धा आजही अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींना समाजात खतपाणी मिळतंय.
आज जागतिक AIDS दिनाच्या निमित्ताने सामान्यत: आढळणाऱ्या अशाच अंधश्रद्धांना किंवा मिथकांना दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला.
या गैरसमजुतीमुळे HIV बाधित लोकांशी समाजात खूप भेदभाव केला जातो. याविषयी वेळोवेळी जागरूकता पसरवून सुद्धा UK मध्ये अजूनही 20% लोकांना असं वाटतं की HIV बाधितांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या लाळेतून पसरतो.
फोटो स्रोत, Getty Images
HIV विषाणूची चाचणी करण्यासाठी रक्ततपासणी करण्याची गरज असते.
पण खरच हा रोग स्पर्श, अश्रू, घाम, लाळ किंवा मूत्रावाटे पसरत नाही.
त्याचप्रमाणे पुढीलपैकी कोणत्याही मार्गाने HIVचा संसर्ग होत नाही-
HIV बाधित व्यक्तीचं रक्त, वीर्य, योनीतील स्राव किंवा अंगावरचं दूध निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेलं तरच हा रोग पसरण्याची शक्यता असते.
पर्यायी औषधं, सेक्स केल्यानंतर अंघोळ करणं, किंवा कुमारिका मुलीबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करणं या सगळ्या गोष्टींमुळे हा रोग बरा होत नाही.
Virgin Cleansing (कुमारिका मुलींबरोबर सेक्स करणं) चा गैरसमज निम-वाळवंटी आफ्रिका, भारतातला काही भाग आणि थायलंडमध्ये प्रचलित आहे. तो अतिशय धोकादायक आहे.
यामुळे अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर लहान बालकांवरही बलात्कार होतो आणि पर्यायाने त्यांनाही HIVचा धोका बळावतो.
या मिथकाचं मूळ 16व्या शतकात पहायला मिळतं. त्यावेळी लोकांना सिफिलीस आणि गन्होरिया या गुप्तरोगांची लागण व्हायला सुरुवात झाली होती.
मात्र कुमारिका मुलींबरोबर सेक्स केल्यामुळे हे रोगही बरे होत नाहीत.
फोटो स्रोत, Getty Images
हा रोग स्पर्श, अश्रू, घाम, लाळ किंवा मूत्रावाटे पसरत नाही.
अशा वेळी धार्मिक विधी आणि प्रार्थना केल्यामुळे या कठीण प्रसंगात मानसिक बळ नक्कीच मिळू शकतं. मात्र असं केल्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या काहीच दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
रक्तामुळे HIV पसरतो हे जरी खरं असलं तरी अनेक संशोधनांअंती हे सिद्ध झालं आहे की रक्तपिपासू कीटकांद्वारे(उदा. डास) हा रोग पसरत नाही. त्याची दोन कारणं आहेत
1) जेव्हा कीटक चावतात तेव्हा त्यांनी आधी चावा घेतलेल्या व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीत सोडत नाहीत.
2) HIVचा विषाणू त्यांच्या शरीरात अल्पकाळ टिकतो.
त्यामुळे एखाद्या परिसरात मोठ्या प्रमाणात डास असतील आणि HIVचा प्रादुर्भाव असेल तरी या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही.
सेक्सच्या इतर प्रकारांपेक्षा ओरल सेक्स म्हणजेच मुखमैथून बऱ्यापैकी सुरक्षित आहे, हे खरं आहे. 10,000 पैकी फक्त 4 केसेसमध्येच AIDS ओरल सेक्सद्वारे पसरतो, असं लक्षात आलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
कंडोममुळे HIVचा संसर्ग गुप्तरोगांचा संसर्गही होत नाही.
मात्र ज्या पुरुषाला किंवा स्त्रीला HIVची लागण झाली आहे, त्या पुरुषाबरोबर किंवा स्त्रीबरोबर ओरल सेक्स केला तर HIVची लागण होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच ओरल सेक्सच्या वेळीही कंडोम वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
सेक्स करताना कंडोम फाटला, निघाला किंवा लीक झाला तर HIVची लागण होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे AIDS बाबत जे जनजागृती अभियान राबवले जातात, त्यात लॅटेक्स शीथ म्हणजेच जाड कंडोम घालण्याचा सल्ला तर देतात.
मात्र त्याचबरोबर HIVची चाचणी करण्याचाही सल्ला देतात. जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ताबडतोब उपचार घेण्याचा सल्ला देतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चारपैकी एका जणाला, म्हणजे तब्बल 94 लाख लोकांना या रोगाची लागण झाल्याची माहिती नसते. त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे.
एखाद्या व्यक्तीला अगदी 10-15 वर्षं या रोगाची लक्षणं जाणवत नाहीत. त्यांना ताप, डोकेदुखी, पुरळ, घसा खवखवणं ही साधारणपणे फ्लूची लक्षणं आढळतात.
फोटो स्रोत, Getty Images
चारपैकी एका व्यक्तीला HIVची लागण झाल्याची कल्पना नसते.
या रोगामुळे जसजशी प्रतिकारक शक्ती कमी होते तसतशी लिंफ नोड सुजणे, वजन घटणे, ताप, डायरिया आणि खोकला, अशी इतर लक्षणंही दिसायला सुरुवात होते.
जर उपचार घेतले नाहीत तर इतर गंभीर आजार व्हायला सुरुवात होते. त्यात क्षयरोग, मेंदूज्वर, जीवाणूसंसर्ग किंवा कॅन्सरचा धोका संभवतो.
ज्या लोकांना HIVची लागण झाली आहे, जे उपचार घेत आहेत, ते चांगलं आयुष्य जगत आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या मते 47% लोकांच्या रक्तात HIVचं प्रमाण इतकं कमी आहे की रक्तचाचण्यांमध्ये हे विषाणू दिसतही नाहीत. ज्या लोकांमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे, त्या लोकांकडून हे विषाणू दुसऱ्यांपर्यंत पसरतही नाहीत.
मात्र त्यांनी जर उपचार घेणं थांबवलं तर HIV पुन्हा रक्तात सापडू शकतो.
फोटो स्रोत, Getty Images
ज्या मातांमध्ये हा विषाणू अगदी नगण्य प्रमाणात असतो त्या माता निरोगी बालकाला जन्म देऊ शकतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 2017 मध्ये 2.17 कोटी रुग्ण रेट्रोविषाणू प्रतिबंधक उपचार घेत होते. 2010 मध्ये ही संख्या 80 लाख होती. ज्या लोकांना HIVची लागण झाल्याची कल्पना आहे, त्यांच्यापैकी 78% लोक उपचार घेत आहेत, असा या आकडेवारीचा अर्थ होतो.
8.आई HIV बाधित असेल तर मुलांनाही होतोच
हे अगदीच सत्य नाही. ज्या मातांमध्ये हा विषाणू अगदी नगण्य प्रमाणात असतो, त्या माता निरोगी बालकाला जन्म देऊ शकतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares