बोलून बातमी शोधा
ऊर्से, ता. १५ : डोणे येथे कृषी विभागामार्फत नुकतेच कोरडवाहू शेती अभियान सन २०२२-२३ अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना सहायक कृषी अधिकारी अक्षय ढूमणे यांनी केली. पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय, मुरघास विषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन पशुसंवर्धन अधिकारी अंकुश देशपांडे व अजय सुपे यांनी केले.
सदर कोरडवाहू शेती अभियान सन २०२२-२३ अंतर्गत गाई, म्हशी खरेदीसाठी शेतकरी निवड लॉटरी काढण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, मंडळ कृषी अधिकारी दत्ता शेटे, कृषी पर्यवेक्षक स्मिता कानडे, सरपंच सारिका कुंभार, उपसरपंच पोपट वाडेकर व मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

Article Tags:
news