दिव्य मराठी विशेष: चांदणी चमकली, ‘इश्क का परछा’ही पाेहाेचला;+61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्राचा न… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अनेक नियमित रसिकांच्या चर्चेतून येणारा निकाल बाजूला सारत परीक्षकांच्या निकालानुसार नाशिकच्या केंद्रावर ६१व्या महाराष्ट्र राज्य हाैशी मराठी नाट्य स्पर्धेत संवर्धन संस्थेच्या ‘चांदणी’ नाटकाने प्रथम, नाट्यसेवा थिएटर्सच्या ‘इश्क का परछा’ नाटकाने द्वितीय तर बाॅश फाइन आर्ट‌्स‌च्या ‘शीतयुद्ध सदानंद’ या नाटकाने तृतीय पारिताेषिक मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने जाहीर केले.
१७ नाेव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत प. सा. नाट्यृहात एकूण २८ नाट्यप्रयाेग या स्पर्धेत सादर झाले. स्पर्धेचे परीक्षण मंगेश नेहरे, किरणकुमार अडकमाेल आणि विश्वास पांगारकर यांनी केले.
अभिनय प्रमाणपत्र : सई माेने-पाटील (शीतयुद्ध सदानंद), माधुरी पाटील (फायनल ड्राफ्ट), प्रतीक्षा बेलसरे (खिडक्या), रूपाली देशपांडे (ब्रेकिंग न्यूज), केतकी पंचभाई (प्रतिकार), आर्यन जाधव (इश्क का परछा), मनाेज शेंद्रे (उलगुलान), अमाेल थाेरात (शक्ती शिवाचा तेजोगोल), धनंजय गाेसावी (शीतयुद्ध सदानंद), संदीप पाचंगे (पळा पळा काेण पुढे पळे ताे)
स्पर्धेत ‘चांदणी’ नाटकाचा व्हाइटवाॅश
संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सादर केलेेल्या ‘चांदणी’ या नाटकाने परीक्षणाच्या सगळ्याच विभागात पारिताेषिके पटकावत व्हाइटवाॅश दाखवून दिला. शेतकऱ्यांची समस्या आणि शेतकरी बाप-मुलाची कथा ‘चांदणी’ या नाटकातून गुंफण्यात आली आहे. दिग्दर्शन प्रथम, प्रकाशयाेजना प्रथम, नेपथ्य द्वितीय, रंगभूषा द्वितीय यासह अभिनयाची दाेन्ही राैप्यपदके ‘चांदणी’मधील कलाकारांना मिळाली आहेत.
दिलीप काळेंना सलग ३ राैप्यपदक
‘चांदणी’ नाटकातील बापाची भूमिका केलेल्या दिलीप काळे यांना अभिनयाचे सलग तिसरे राैप्यपदक मिळाले आहे. गेल्यावर्षी नाशिक केंद्रावर झालेल्या ‘आला रे राजा’ या नाटकात त्यांच्या राजाच्या भूमिकेला केंद्रातून राैप्यपदक, तर अंतिम स्पर्धेतही त्यांना राैप्यपदकाने गाैरविले हाेते. तर यावर्षीही त्यांना ‘चांदणी’ नाटकातील भूमिकेसाठी राैप्यपदक जाहीर झाले आहे.
इरिगेशनमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले दिलीप काळे हे केवळ नाटकाची आवड असल्याने नाटकात काम करतात. दिवंगत दिग्दर्शक प्रशांत हिरे यांनी आपल्यावर नाट्यसंस्कार केले आणि आता दिग्दर्शक राेहित पगारे आपल्याकडून चांगल्या भूमिका करून घेत असल्याचे ते प्रामाणिकपणे सांगतात. राैप्यपदक मिळाल्याने आनंद झाल्याचे त्यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares