बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी… – BBC

Written by

फोटो स्रोत, Ani
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन चार महिने झाले. हे सरकार स्थापन झाल्यापासूनच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.
आतापर्यंत कधी 'गद्दारी', तर कधी '50 खोके' या आरोपांनी शिंदे सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात येत होता.
त्यामध्ये आता राज्यात येऊ घातलेले 'प्रकल्प राज्याबाहेर' जात असल्याच्या आरोपांची भर पडली आहे.
गेल्या आठवड्यात टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरून वादविवाद सुरू होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.
यानंतर आज RTI अंतर्गत माहितीच्या मुद्यावरून पुन्हा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प चर्चेत आला. वाचा, याविषयी सत्ताधारी आणि विरोधक यांचं म्हणणं नेमकं काय आहे..
महिला पत्रकारानं टिकली लावली नाही म्हणून तिच्याशी बोलायला शिवप्रतिष्ठान संघटनेच्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी नकार दिला. 2 नोव्हेंबर 2022 रोजी भिडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटायला मंत्रालयात गेले होते, तेव्हा हा प्रकार घडला.
फोटो स्रोत, Getty Images
भिडे असंही म्हणाले की "प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे आणि भारत माता विधवा नाही आहे."
या वादग्रस्त विधानांची दखल राज्याच्या महिला आयोगानंही घेतली आहे आणि भिडे यांना नोटीस पाठवून या विधानाबद्ल स्पष्टीकरण मागितलं देण्यास सांगितलं आहे. पण कुंकू-टिकलीचा महिलांच्या कर्तृत्वाशी संबंध आहे का?
बलात्कार पीडितेवर करण्यात येणाऱ्या '2 फिंगर टेस्ट'वर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली आहे. महिलेवर बलात्कार झालाय का नाही? हे तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात येते.
फोटो स्रोत, Getty Images
ही चाचणी 'पितृसत्ताक आणि अवैज्ञानिक' आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टाने ही टेस्ट वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्याचा आदेश दिलाय.
2013 मध्ये दिल्ली निर्भया बलात्कार प्रकरणानंतर यावर बंदी घालण्यात आली होती. तरीदेखील देशातील काही भागात ही टेस्ट केली जात होती. कोर्टाने यापुढे ही चाचणी करणाऱ्याला दोषी धरलं जाईल, असे निर्देश दिले आहेत.
बलात्कारासंबंधी खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. '2 फिंगर टेस्ट' काय आहे? यावर वाद का झाला? वैद्यकीय तज्ज्ञांकडून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
वितळतं बर्फ, समुद्राला उधाण, पूर, दुष्काळ, कोसळती घरं, शेतीचं नुकसान… हवामान बदलाचे परिणाम म्हटलं, की या गोष्टी तुमच्या नजरेसमोर येत असतील.
फोटो स्रोत, Getty Images
पण हवामान बदलाचा माणसाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
भारतासारख्या देशात हा परिणाम तीव्रतेनं जाणवतो आहे. इथे उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 55 टक्के वाढ झाल्याचं लॅन्सेट या मेडिकल जर्नलच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे. वाचा, हवामान बदलामुळे कोणते आजार होण्याची शक्यता आहे..
नुकताच चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे.
फोटो स्रोत, vedat marathe veer daudle saat
या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहे. मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु या चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2023 च्या दिवाळीला हा चित्रपट येईल असे निर्मात्यांनी सांगितले आहे.
वसीम कुरेशी यांच्या कुरेशी प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. जाणून घ्या चित्रपटाबद्दल सर्वकाही..
ब्राझीलमधील सत्तापालटाचा भारतवर काय परिणाम होईल? | सोपी गोष्ट 719
हर्षल नक्षणेनं ल्फ ड्रायव्हींग आणि हायट्रोजन फ्युल सिस्टमच्या पेटंटसाठी नोंदणी केली आहे.
पंतप्रधान मोदी मोरबीच्या दौऱ्यावर, तुटक्या पुलावर काय दिसलं?
खरं बोलण्याची शिक्षा म्हणून अगणित लोक तुरुंगात आहेत – नसिरुद्दीन शाह
इम्रान खान यांच्या रॅलीवर गुजरानवालामध्ये गोळीबार, त्यांना गोळी लागली तो क्षण…
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares