आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
मिरजगाव येथील सीना नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहारातील आरोपींवर कारवाई करुन ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत या मागणीसाठी मिरजगाव येथील नगर-सोलापूर रस्त्यावर क्रांती चौकात गाव बंद ठेवून रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांनी गावात फेरी काढून संचालक मंडळाचा निषेध करुन क्रांती चौकात आंदोलन केले. आंदोलनात सुनील भालेराव, माजी सरपंच सारंग घोडेस्वार, सुनिल बावडकर, सादिक शेख,आण्णा दळवी,फारूख शेख,मिराबाई रायते,बेबी भोसले, अनिता गदादे,सुधीर आखाडे, ईश्वर तरंगे, रंगनाथ म्हेत्रे, महादेव शिंदे आदी उपस्थित होते.
आंदोलकांनी पतसंस्थेचे संस्थापक डॉ. ए. बी.चेडे व चेअरमन एकनाथ खेतमाळस यांच्या विश्वासावर सर्वसामान्य मंजूर, शेतकरी, निवृत्त कर्मचारी यांनी ठेवी ठेवल्या. परंतु संचालक मंडळाने भ्रष्टाचार करून लोकांच्या ठेवी हडप केल्याचा आरोप केला. आंदोलकांना उत्तर देताना कर्जतचे सहाय्यक निबंधक सुखदेव सुर्यवंशी म्हणाले, संस्थेची चौकशी होऊन संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. आरोपींवर भरपाई रक्कम ३१ डिसेंबर पर्यंत निश्चित होऊन पुढील कारवाई करणार असल्याने आश्वासन त्यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

Article Tags:
news