'शेतकरी दुर्लक्षित घटक', मराठी मालिकेतून पहिल्यांदाच मांडणार … – News18 लोकमत

Written by

पतीच्या निधनानंतर दोन मुलांची जबाबदारी, हिंमत न हारता मिळवला हा मान
'आता वेळ आलीए पूर्ण विराम देण्याची…' नक्की कशाविषयी बोलतोय सुव्रत जोशी?
चोरी पकडली गेली; Jhoome Jo Pathaanआहे या प्रसिद्ध गायकाच्या गाण्याची कॉपी?
प्रसिद्ध लेखिकेने साधला अभिषेकवर निशाणा;अभिनेत्याने उत्तर देताच डिलिट केलं ट्विट
मुंबई, 18 नोव्हेंबर :  टेलिव्हिजनवरील मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. मालिकेतील पात्र प्रेक्षकांना आपली वाटतात. आजही अनेक मालिका प्रेक्षक पुन्हा पुन्हा पाहताना दिसतात.  पण मागच्या काही वर्षांपासून मालिका आणि त्यांच्या कथांचा ट्रेंड बदलू लागला आहे. दर दोन मालिकांनंतर तिसऱ्या मालिकेची कथा सारखी वाटू लागते. बऱ्याच ठिकाणी तिच रडारड तोच ड्रामा. असं असलं तरी प्रेक्षक मात्र मालिका पाहणं सोडत नाही. अशातच आता रडक्या मालिकांना वैतागलेल्या प्रेक्षकांसाठी कलर्स मराठी वाहिनीनं नव्या विषयी नवी कोरी मालिका आणली आहे. ज्याच नावं आहे शेतकरीच नवरा हवा.  मराठी मालिकेतून पहिल्यांदाच शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात येणार आहे. या मालिकेच्या निमित्तानं मालिकेतील प्रमुख कलाकारांची गप्पा मारत असताना त्यांना शेतकऱ्यांविषयी आपलं मत मांडलं. ते काय म्हणालेत पाहा.
शेतकरीच नवरा हवा मालिकेत अभिनेता प्रदीप घुले हा सातारचा रांगडा गडी सयाजीची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री रुचा गायकवाड रेवा ही भूमिका साकारत आहे. मातीतल्या अनोख्या प्रेमकहाणीतील हे दोघे प्रमुख कलाकार आहे. ही केवळ मातीतील प्रेमकहाणी नसून शेतकऱ्याच्या व्यथा यातून मांडण्यात येणार आहेत.
हेही वाचा – प्राजक्ता गायकवाड पुन्हा येसूबाईंच्या भूमिकेत; डबिंगलाही सुरूवात, पाहा VIDEO
प्रदीप आणि रुचा हे दोघेही शेतकरी कुटुंबातील आहे. रुचाही कोकणातील असून तिच्या घरीही शेती केली जाते. तर प्रदीप हा मुळचा सातरचा असून त्याचे आई वडील भाऊ हे शेतकरी आहेत. लॉकडाऊनच्या काळात तो 2 वर्ष गावी होता. तेव्हा दररोज 12-13 तास तो शेतीची काम करत होता.त्यामुळे दोघांनाही शेतकऱ्यांच्या समस्या फार जवळून पाहिल्या आहेत. याविषयी बोलताना प्रदीप म्हणाला, 'शेतकरी हा फार दुर्लक्षित घटक आहे. कारण शेतकरी जेव्हा पिक काढतो तेव्हा त्याला बाजारभाव नसतो. त्याने आधीच भांडवल गुंतवलेलं असतं मग तो ते परत कसं मिळवणार'.

प्रदीप पुढे म्हणाला, 'सरकारला आवाहन आहे की, शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे. त्याला बाजारभाव मिळाला तर त्याच्या पदरात काही तरी पडेल आणि तो जगू शकेल. तो जगला तर आपण जगू.  त्यामुळे शेतकऱ्याला जगवणं हे तुमच्या हातात आहे'.

रुचा याविषयी म्हणाली, 'शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुख सोयी आणखी चांगल्या कशी होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे.  गोष्ट फक्त शेतकऱ्याची नाहीये त्याच्या बायका पोरांचीही आहे. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करायला हवा. त्यांना शिक्षण मिळालं तर त्यांचं भविष्य चांगलं होईल. केवळ शेतकरीच नाही तर शेतकऱ्यालाही कुटुंब असतं  त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares