Swabhimani Shetkari Sanghatana : पीक विमा कंपन्यांसमोर सरकार झुकतंय, तुपकरांचा आरोप, हिंगोलीच्या – ABP Majha

Written by

By: माधव दिपके | Updated at : 23 Dec 2022 01:11 PM (IST)
Edited By: गणेश लटके
Ravikant Tupkar
Swabhimani Shetkari Sanghatana : पीक विमा कंपन्यांसमोर सरकार झुकत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केला आहे. पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज हिंगोलीच्या (Hingoli) कृषी अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. शेकडो शेतकऱ्यांचा ताफा घेऊन गोरेगावहून  रविकांत तुपकर हे हिंगोलीच्या दिशेने निघणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, या अधिवेशनात नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलत नसल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.
पिक विम्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना हिंगोलीच्या कृषी अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.  जोपर्यंत पिकविमा मिळत नाही तोपर्यंत कृषी अधीक्षक कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ताबा घेणार असल्याचा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रीमियम पेक्षाही कमी पिक विमा परतावा मिळाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं तुरकरांनी सांगितलं.
हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीनं पीक विम्यापासून वंचित ठेवलं आहे. गेल्या वर्षीसुद्धा करोडो रुपये शेतकऱ्यांचे थकवले होते. प्रीमियम पेक्षाही कमी शेतकऱ्यांच्या खात्यात जमी झाले असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले. त्यामुळं आज आम्ही मोर्चा काढत असल्याचे तुपकर म्हणाले. किती दिवस झालं आम्ही आंदोलन करत आहोत. तरी काही होत नाही. पीक विमा कंपन्यांसमोर सरकार झुकत असल्याचा आरोप तुपकरांनी केला. सरकारचा पाठबळ पीक विमा कंपन्यांना आहे, सरकार त्यांना पाठिशी घालण्याचं काम करत असल्याचे तुपकर म्हणाले. सरकार आणि पीक विमा कंपन्यांचे साट-लोट आहे. त्यामुळं हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोपर्यंत पीक विम्याची पूर्ण रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा तुपकरांना दिला आहे.
वारंवार आम्ही निवेदने देत आहोत. आंदोलन करत आहोत. मात्र, विमा कंपनी तारीख पे तारीख देत आहे. कृषी विभागाचं याकडे दुर्लक्ष असल्याचे तुपकर म्हणाले. सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा. आम्ही आता मागे हटमार नसल्याचे तुपकर म्हणाले. सरकारमध्ये हिंमत असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकावे असे तुपकर म्हणाले. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुळ प्रश्नावर कोणतीही चर्चा होत नसल्याचे तुपकर यावेळी म्हणाले.  

News Reels
महत्त्वाच्या बातम्या:
Hingoli: वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी, शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये लढत
Gram Panchayat Election : राज्यात महाविकास आघाडीच्या गोटात 4019 ग्रामपंचायती; अजित पवार यांचा दावा
काय सांगता! चक्क आमदाराच्या घरी चोरट्यांचा डल्ला, हिंगोली जिल्ह्यातील घटना
Hingoli News : जिल्हा परिषद शाळेत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विद्यार्थ्यांना दिले गणिताचे धडे
Agriculture News : बदलत्या वातावरणाचा गुलाब उत्पादकांना फटका, रोगांचा प्रादुर्भाव वाढला; दरांमध्येही घसरण
Mumbai Corona: मुंबईकरांनो सावधान! राजधानीत कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेच्या विशेष सूचना
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला सीबीआयकडून अटक, काय आहे प्रकरण?
Lokayukta Act: दहा वर्षानंतर येणार अंतिम स्वरुप, कसा असेल लोकायुक्त कायदा?
One Rank One Pension: मोदी सरकारचा मोठा निर्णय,  वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणा, 25 लाख जणांना होणार फायदा 
IPL Auction: 80 खेळाडू मालामाल, 10 संघांनी खर्च केले 167 कोटी; तुमच्या आवडत्या संघात कोणता खेळाडू

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares