वसुबारसेपासून सलग पाच दिवस गोठ्यातील जनावरांची मनोभावे सायंकाळी पुजा करतात.
गुराखी पोरं ओढ्याकाठच्या लव्हाळीच्या गवतांच्या दिवट्या करून त्या, गोठ्यातील गुरांना गीत म्हणत ओवाळतात.
‘दिन-दिन दिवाळी- गाई म्हशी ओवाळी गायीचा चारा बैल नवरा’
बैलाचे बाशिंग किंकरं ताशिन किकरे कुणाचे लक्ष्मणाचे
किकऱ्याची धार गाईला नैवेद्य चार उदेग अंबे उदे उदे हर हर महादेव’!
या दिवशी विवाहित स्त्री या एकच वेळ जेवण करून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स धेनूची पूजा करतात. ‘हे नंदिनी माते, तू माझे मनोरथ पूर्ण कर’ अशी प्रार्थना करतात.
© agrowon 2022
Article Tags:
news