राहुरीचे धर्मांतर विधिमंडळात; दराडे नियंत्रण कक्षात – Pudhari

Written by

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील धर्मातंराचा मुद्दा आ. राम सातपुते यांनी विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशानत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांमार्फत चौकशीचे आदेश देत त्यांची बदली तातडीने नियंत्रण कक्षात करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दराडे यांच्या तडकाफडकी बदलीचे पडसाद राहुरीत उमटले असून त्या निषेधार्थ दोघींनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान आज राहुरी रास्तारोको करण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी केला आहे.
दराडे यांच्या बदलीचे वृत्त समजातच पिंटू साळवे व सचिन साळव, सुभाष संसारेे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ ओतून आत्मदहनचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिस ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली.पोलिसांनी धावाधाव केल्याने अनर्थ टळला. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. माळशिरसचे आ. राम सातपुते यांनी लक्षवेधी मांडत  राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील धर्मांतराच्या मुद्याला हात घातला. अन्य दोन आमदारांनी तो मुद्दा उचलून धरल्याने मंत्री देसाई यांनी दराडेंची बदली नियंत्रण कक्षात करण्यासोबतच चौकशीचे आदेश दिले. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी आदेशाची तातडीने अंमलबजावणी केल्याने संतप्त झालेल्या दोघांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाने बदलीचा निषेध नोंदविला.
दराडे यांच्या बदलीचा निषेध करत संपूर्ण राहुरी तालुका एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्व पक्षिय नेत्यांनी आज (शनिवारी) नगर- मनमाड रस्त्यावर राहुरीत रास्तारोको आंदोनल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ब्राम्हणी गावामध्ये 3 एप्रिल रोजी हिंदू धर्माच्या देव-देवतांचा अपमान करीत एका वयोवृद्ध महिलेचे धर्मांतरण करताना विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पोलिस निरीक्षक दराडे यांनी आरोपीचा बचाव केल्याचा ठपका ठेवत आ. सातपुते व अन्य दोन आमदारांनी लक्षवेधी मांडत कारवाईची मागणी केली. ब्राम्हणी येथील धर्मांतरण प्रकरणामध्ये हलगर्जीपणा व दिरंगाई केल्याचे कबुल करत मंत्री देसाई यांनी बदलीचे आश्वासन दिले.
अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी दराडे यांची बाजू घेत कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचा राजकीय बळी जाऊ देणार नसल्याचे भूमिका घेतली. दराडे यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत गुन्हेगारीवर अंकूश ठेवल्याचे सांगत त्यांच्या कर्तव्याची प्रशंसा करत तालुका त्यांच्या बदलीविरोधात एकवटला आहे.  जात-पात, धर्म न मानता कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक दराडे यांचा राजकीय बळी घेऊ नका, असे सांगत उद्धव ठाकरे शिवसेना, आरपीआय (आठवले गट), राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाळासाहेबांच्या शिवसेनेसह विविध सामाजिक व राजकीय संघटना, विद्यार्थी व विद्यार्थींनीनी दराडे यांच्या समर्थनार्थ रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे.
विकास कामांच्या श्रेयातून राहुरीत भाजप-राष्ट्रवादीमध्ये राजकीय वातावरण तापले असतानाच आतज्ञा दराडेंच्या बदलीच्या मुद्याने संपूर्ण तालुका एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 
दराडे यांनी दहा महिन्याच्या कालावधीत चांगले काम केले. राहुरीची गुन्हेगारी आटोक्यात आणली. राहुरी तालुक्यात इतरांनी (आ. राम सातपुते) यांनी सुपारी घेऊन नका खुपसु नये. दराडे यांची बदली केल्यास उग्र आंदोलन हाती घेतले जाईल.                                                        -रावसाहेब खेवरे, शिवसेना जिल्हाप्रमुख
राहुरीत कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दराडे यांची महत्त्वाची भूमिका आहे. सामाजिक वाद निर्माण करणार्‍यांकडून पोलिस अधिकार्‍यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला जातो. राजकीय बळ वापरुन कारवाई करुन त्रास देण्याचे काम केले आहे.
                                         – सुरेंद्र थोरात,  आरपीआय जिल्हाअध्यक्ष
प्रताप दराडे यांनी कधी चुकीचे काम केले नाही. खोटे गुन्हे दाखल केले नाही, मात्र अधिवेशनात माळशिरसचे आ. सातपुते यांनी लक्षवेधी उपस्थित करत असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कोठे होते?. राजकीय सुडबुद्धीतून ही बदली आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. बदली थांबली नाही तर उग्र आंदोलन करू.
                                       – रवींद्र मोरे,  शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares