संवाद: व्यापारी आणि शेतकऱ्यांचा समेट; बाजार समिती पूर्ववत, शेतकऱ्यांनी मानले आभार – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
काेपरगाव बाजार समिती येथील शेतकऱ्यांची हक्काची संस्था अाहे. सध्या खरीप हंगामातील पिके काढून ती मोठया प्रमाणात बाजार समितीत शेतकरीवर्ग विक्रीसाठी घेऊन येतात मात्र काही कुरबुरीमुळे शुक्रवारी शेतमाल विक्री व्यवस्था बंद करण्याच्या मार्गावर होती, भाजपच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी शेतकरीदिनी येथील शेतकरी, व्यापारी आणि हमाल बांधवांशी चर्चा करून समेट घडवून आणला आणि शेतमाल विक्री व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांनी कोल्हे यांना धन्यवाद दिले. गेल्या दोन वर्षापासून कोरोना आपत्ती संकटाशी आपण सर्वचजण दोन हात करतो आहोत, पर्जन्यमान बऱ्यापैकी आहे, खरीप हंगाम ऐन पीक काढणीत असतांना शेतक-यांना अतिवृष्टीमुळे दणका दिला त्यामुळे जी पिके शेतकऱ्यांच्या हाती लागली होती ती त्यांनी कोपरगांव बाजार समितीत विक्री व्यवस्थेसाठी आणली पण स्थानिक पातळीवर भावावरून शुक्रवारी संघर्ष सुरू झाला होता. ही विकी व्यवस्था पुन्हा आठ दहा दिवस बंद पडली तर शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळेल, त्यांना रब्बी पीक लागवडीसाठी आर्थीक नियोजन करता येणार नाही अशा एक ना अनेक अडचणी असतांना भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शुकवारी थेट भेट सर्याच्या समस्या ऐकून घेत त्यावर समाधानकारक तोडगा काढुन बाजार समितीत शेतमाल विकी व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात आली. याप्रसंगी विविध संस्थांचे आजी माजी संचालक, पदाधिकारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares