National Farmer's Day 2022 : राष्ट्रीय शेतकरी दिवस का साजरा केला जातो? – Agrowon

Written by

Kisan Diwas 2022: आज देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा (National Farmer’s Day) केला जात आहे. यानिमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या योगदानासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. पण तुम्हाला माहित आहे का? की राष्ट्रीय शेतकरी दिवस फक्त २३ डिसेंबरलाच का साजरा केला जातो? वास्तविक, हा विशेष दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो.
या दिवशी शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेतीसंबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात. चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती.
कोण होते चरण सिंग ?
चौधरी चरण सिंग यांचा जन्म चौधरी मीर सिंग व नेत्रा कौर यांच्या परिवारात, २३ डिसेंबर १९०२ रोजी, उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ येथील नूरपूर या गावी झाला. गरिब परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या चरण सिंग यांनी याच उत्तरप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली व पुढे भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून पद ग्रहण केले. राजकारणात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असतानाही त्यांनी प्रत्येक वेळी आपले लक्ष गरीब, मजूर, शेतकरी यांच्या प्रश्नांकडे ठेवले. म्हणूनच आजही शेतकऱ्यांचे पुढारी म्हणून चरण सिंग प्रत्येकाच्या आठवणीत आहेत.
चौधरी चरण सिंह यांच्याबाबत…
आपण जिथे जन्म घेतो, ज्या परिस्थिती मध्ये वाढतो आणि ज्या समाजात राहतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. शेतकऱ्यांची गरिबी, दुःख त्यांच्या समस्या जवळून अनुभवणाऱ्या व मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये वाढलेल्या चरण सिंह यांनी पुढे आयुष्यभर शेतकरी आणि मजूर यांच्या हितासाठी प्रयत्न केले. चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना जमीनदारी रद्द केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद पद बनवलं. त्यानंतर ते उपपंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधान झाले. मात्र, त्यांचा कार्यकाळ हा जास्त मोठा नव्हता. २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० या काळात ते देशाचे पंतप्रधान होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या संदर्भातील सुधारणांबाबतचे बिल सादर करत कृषी क्षेत्रात आपली भूमिका ठामपणे मांडली होती. २९ मे १९८७ मध्ये चौधरी चरण सिंह यांचं निधन झालं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
© agrowon 2022

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares