Successful Farmer: मानलं लेका तुला…! युट्युबवर व्हिडिओ पाहून एका … – Ahmednagarlive24

Written by


Successful Farmer: देशात शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून रोजाना नवनवीन प्रयोग कार्यान्वित करीत आहेत. काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याचा ठरत आहे.
जर शेतीमध्ये पीकपद्धतीत बदल केला तर निश्चितच लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) करणे शेतकरी बांधवांना शक्य होणार आहे. बिहार (Bihar) मधील एका शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात बदल करत लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे.
बिहारच्या भागल्पुर जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याने काळाच्या ओघात पीकपद्धतीत बदल करत स्ट्रॉबेरी शेती (Strawberry Farming) सुरु केली. भागलपूर जिल्ह्यातील मौजे खरीकचे तीन शेतकरी सध्या स्ट्रॉबेरीची शेती करीत आहेत. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरी शेतीतुन मिळणारी स्ट्रॉबेरी ते शेतकरी ऑनलाईन पद्धतीने विक्री करत आहेत.
खरीक येथील उस्मानपूरचे शेतकरी खगेश मंडळ आज स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करत आहेत. त्यांच्या शेतात लागवड केलेल्या स्ट्रॉबेरी फळांची ऑनलाइन विक्री केली जात आहे. त्याच्यासोबत आणखी दोन शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. यासोबतच काजरेली येथील गुंजेश गुंजन व कहलगाव येथील शेतकरीही स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. स्ट्रॉबेरीचे रोप फुलू लागताच ऑनलाइन बुकिंग सुरू होते.
यूट्यूब विडिओ पाहून स्ट्रॉबेरी लागवड सुरू केली
Eucalyptus Farming : निलगिरी लागवड करताय का? थांबा ! आधी त्याचे तोटे तर पाहा ; पैशांच्या गडबडीत जमीन जाईल वाया
बोंबला…! अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ तालुक्याचा पीएम कुसुम सोलर योजनेत समावेशच नाही ; नेमका काय आहे माजरा
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! प्रतिकूल परिस्थितीत मिळवलं द्राक्षाचं विक्रमी उत्पादन ; 125 रु. प्रति किलो…
खरिक ब्लॉकमधील उस्मानपूरचे शेतकरी खगेश मंडल हे कोबीची शेती करायचे. त्यांनी यूट्यूबवर स्ट्रॉबेरीच्या लागवडीची माहिती घेतली. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर बिहार कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधला.
बीएयूच्या शास्त्रज्ञांनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास प्रोत्साहन दिले. सर्व सुविधा देऊन शेतीची तांत्रिक माहिती दिली. 2018 मध्ये खगेशने त्याच्या सहकारी शेतकऱ्यासोबत महाबळेश्वर, पुणे येथून सात हजार रोपे आणली आणि अर्ध्या एकरात लावली. 
एक रोप 15 रुपयांना विकत घेतले. पहिल्या वर्षीच चांगले पीक आले. शेतकरी खगेश मंडळने यावर्षी एक एकरात स्ट्रॉबेरीची लागवड केली. या पिकाची लागवड करण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च आला, तर उत्पन्न पाच ते सहा लाख रुपये आल्याचे त्यांनी सांगितले.
स्ट्रॉबेरी शेती ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे विक्रीसाठी बाजार शोधण्याची गरज नसते. या शेतकऱ्यांना देखील स्ट्रॉबेरी विक्रीसाठी कुठलीच अडचण आली नाही. परिणामी त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.
निश्चितच या शेतकऱ्याने काळाच्या ओघात केलेला हा बदल इतरांसाठी प्रेरणा देणारा आहे. शेती व्यवसायात सातत्याने नवनवीन प्रयोग करत राहिले तर निश्चितच कमी क्षेत्रात देखील अधिक उत्पन्न मिळवले जाऊ शकते हे या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.
Prev Post
शेतकरी हा ब्रँड आहे ब्रँड…! अमेरिकेत 80 लाखांच्या पॅकेजची नोकरींला लाथ मारली; पट्ठ्याने सुरु काकडीची शेती, आज पट्ठ्या कमवतोय करोडो रुपये
Next Post
Cheap Prepaid Plans: या प्रीपेड प्लॅनमध्ये 80 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा मिळेल, दररोज 5 रुपयांपेक्षा कमी करावा लागेल खर्च
St Employee News : मोठी बातमी ! ‘या’ एसटी कर्मचाऱ्यांच्या अंगलट आला संप ; ‘इतक्या’ दिवसांचे वेतन कापलं
Flipkart Offer : भन्नाट ऑफर ! अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करा iPhone 13 ; कसे ते जाणून घ्या
IMD Alert : सावध राहा ! 6 राज्यांमध्ये 12 जानेवारीपर्यंत पाऊस तर 5 राज्यात थंडीची लाट; जाणून घ्या ताजे अपडेट
Broadband Plan : वर्षाला वाचतील हजारो रुपये! मिळेल हायस्पीड इंटरनेट, जाणून घ्या प्लॅन
Latest News Updates
Mangal Gochar 2023 : या ३ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, 13 जानेवारीला होणार मंगळाचे संक्रमण
Vastu Tips For Kitchen: समस्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत तर स्वयंपाकघरातून पटकन काढून टाका ‘ह्या’ गोष्टी
TOYOTA Upcoming Car 2023 : लवकरच लाँच करणार टोयोटा या दमदार कार, पहा फीचर्स
IND vs SL: श्रीलंकेच्या अडचणीत वाढ ! भारतीय संघात परतणार ‘हा’ स्टार गोलंदाज ; निवडकर्त्यांनी घेतला मोठा…
Jio Recharge Plan : जिओचे सर्वोत्तम प्लॅन ! या प्लॅनमध्ये मिळेल नेटफ्लिक्स किंवा ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ, तेही विनामूल्य
OnePlus : स्वस्तात मिळतोय हा दमदार स्मार्टफोन, मिळत आहे जबरदस्त फीचर्स
Soybean Rate : सोयाबीन दरात मोठा उलटफेर ! वाचा आजचे बाजारभाव
Smartphone Offers : पुन्हा संधी मिळणार नाही ! ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन मिळत आहे 22 हजारांनी स्वस्त ; पहा…
Smartwatch : स्वस्तात मिळताहेत हे स्मार्टवॉच, फुल्ल चार्ज केल्यावर चालते 7 दिवस

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares