नवरीची घोड्यावरुन एन्ट्री, अकोल्यात अनोख्या लग्नाची चर्चा, पाहा फोटो – महाराष्ट्र टाइम्स

Written by

आपल्या समाजात लग्नात घोड्यावर केवळ मुलालाच बसवले जाते पण एका पित्याने मुलगा-मुलगी भेद न मानता लाडक्या लेकीची वरात घोड्यावरून काढली. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील खेर्डा खुर्द गावातील हे शेतकरी वडील असून मुलगी मुलापेक्षा कमी नाही, असंही वडिलांनी सांगितलं.
सपना नावाच्या मुलीला धूमधड्याक्यात निरोप देण्यासह समाजाला स्त्री-पुरूष समानतेचा संदेशही त्यांनी यावेळी दिला. महिला एक नव्हे तर दोन घर प्रकाशमान करते, असेही त्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी गोवर्धन तान्हुजी सदाशिव व त्याच्या पत्नी कल्पना सदाशिव यांनी आपल्या मुलीच्या जन्मावेळीच तिच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न बघितली. दोन भावंडांमध्ये गोवर्धन यांची मुलगी सपना मोठी झाली. तिने उच्चशिक्षण पूर्ण केले.
काही दिवसांपूर्वीच सपनाचे लग्न जल संसाधन मंत्रालय नाशिक येथे नोकरीवर असलेल्या प्रशिश विजय खंडारे यांच्यासोबत जुळवले. यावेळी तान्हुजी कुटूंबाने आपल्या मुलीची वरात घोड्यावरून काढण्याचे ठरविले. त्यानुसार लग्नाची तयारी झाली.
घोड्यावरून जाणाऱ्या वधूची वरात बघण्यासाठी जवळपासच्या गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सध्या जिल्ह्याभर या अनोख्या लग्नाची मोठी चर्चा आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares